मुरुम येथे नगर परिषद कार्यालयासमोरअन्नत्याग बेमुदत उपोषण अदोलन सुरू.
……………………………………………
अंदोलनाचा दुसरा दिवस.
…………………………………………….
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
मुरूम नगर परिषद हद्दीतील मातोश्री
रमाई आंबेडकर चौक,नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन व प्रतीभा निकेतन विद्यालय कॉलेजच्या ७५ मीटर पेक्षा कमी अंतरवर व रहीवासी भागात सुरू असलेल्या आकाश बिअर बार व रेस्टॉरंट हे नियमबाह्य बार परवाना रद्द करावे किंवा स्थलांतर करण्याबाबत चे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक धाराशिव यांना देवुन (दि.७)रोजीपासुन अंदोलन सुरू करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,मुरुम हद्दीतील त्रस्त नागरिक,विद्यार्थी, पालक, हे नगरपालिका, प्रतिभानिकेतन विद्यालय पोलीस ठाणे आदिसह ठिकाणी आपापल्या कामासाठी ये जा करत असतात सर्व ठिकाणच्या अवघ्या ७५ मीटरपर्यंत च्या अंतरावर अकाश बियरबार व रेस्टॉरंट हे अनाधिकृत रित्या रात्री बारा ते एक वाजेपर्यंत निवासस्थानी घरामध्ये मध्य विक्री सुरु असल्यामुळे या मार्गावरील येणाऱ्या नागरीक ,महिला, विद्यार्थी यांना तळीरामाचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असुन तळीरामाचा रस्त्यावर गोंधळ रस्त्यावर मूत्रविसर्जन करणे अदि बाबीच्या नाहक त्रासास सामोरे जावे लागते असल्याचने सदरील बियर बार व रेस्टॉरंट तेथुन स्थलांतरित करुन जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्याचे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
दिलेल्या नवेदनावर उपोषणकर्ते अनंदकुमार मारुती कांबळे,दिनेश भालेराव, प्रदिप गायकवाड, यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आले आहेत.
माहिती स्तव कार्यवाही करिता, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यलय उमरगा, मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय मुरुम याना निवेदनाच्या प्रती अंदोलकांनी सादर करण्यात आले आहे.








