Best News Portal Development Company In India

श्रीराम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची निवड|

श्रीराम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची निवड|

उपाध्यक्षपदी पुष्पक कौलकर तर सचिवपदी अभिजित कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्रीराम गणेश मंडळाची गणेशोत्सव 2026 साठी बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, पुष्पक कौलकर याची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी अभिजित कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोनार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळाची नुकतेच सोनार गल्ली येथील माऊली भक्त आश्रम येथे गणेशोत्सव 2026 संबंधित बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गणेशोत्सव 2026 कार्यक्रमांची रूपरेषा व पदाधिकारी निवड करण्यात आले यामध्ये अध्यक्षपदी मुरूम नगर पालिका नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, उपाध्यक्ष म्हणून पुष्पक कौलकर तर सचिव म्हणून अभिजित कुलकर्णी यांचे सर्वानुमते निवड करण्यात आले व गणेशोत्सव 2026 विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले. याबैठकिला माजी अध्यक्ष सागर पोतदार, गोविंद कौलकर, सतीश वेदपाठक, राजु खुने, महादेव महामुनी, प्रवीण पंडित, निलेश महामुनी, अमोल वेदपाठक, अमित पोतदार, आशिष वेदपाठक, प्रसाद महामुनी, समर्थ कडगांचे, शिवराज बोळशेठठे, गौरी बोगंरगे, सागर शिंदे,ईश्वर कडगांचे, किशोर महामुनी, राजू दीक्षित, योगेश पोतदार, संकेत पंडित, अप्पू कोळी, राहुल विभुते, रुद्र वेदपाठक, यांच्यासह मंडळाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail