*उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील विविध विषयांवर मान्यवरांची बैठक-अश्विन केळकर*
मुंबई : उद्योग व व्यवसाय क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज उद्योजक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची बैठक पार पडली. या बैठकीत व्यवसाय क्षेत्रातील सद्यस्थिती, आगामी संधी आणि परस्पर सहकार्याच्या विविध शक्यतांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उद्योजक ऋषिकेश पाटणकर, उद्योजक मधूकर मांगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग श्री अभिजीत आपटे,
अश्विन केळकर मुंबई विभाग अध्यक्ष,
ज्ञानेश्वर मराठे जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण
आणि सुजित गुप्ता मुंबई पश्चिम अध्यक्ष उपस्थित होते.
उद्योग-व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. भविष्यातही अशा स्वरूपाचा संवाद आणि सहकार्य कायम ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.






