Best News Portal Development Company In India

कोरडा दुष्काळ जाहीर करा! मंगरूळमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर ‘रास्ता रोको’.

कोरडा दुष्काळ जाहीर करा! मंगरूळमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर ‘रास्ता रोको’.
​तुळजापूर प्रतिनिधी:-
पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे रविवारी (दि. १३) शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंगरूळसह पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांनी तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर सुमारे एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

​शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या-
निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलनादरम्यान खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

​कोरडा दुष्काळ जाहीर करा- परिसरात पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
​तातडीने पंचनामे व आर्थिक मदत: पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी.

​पीकविमा दावे निकाली काढा- प्रलंबित असलेले पीकविम्याचे दावे त्वरित निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत.
​वीजमाफी व दुष्काळी योजना- शेतकऱ्यांचे वीज बिल संपूर्णपणे माफ करावे आणि सर्व दुष्काळी योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी.

​विद्यार्थ्यांना फी माफी- दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी.
​
शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्काच्या लढ्यात परिसरातील अनेक नेते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंददादा डोंगरे, सतीश डोंगरे, चित्तरंजन सरडे, सुनील जाधव, श्याम पाटील, सौदागर जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​शासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india