*बलसुर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेची स्थापना*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि.१४.उमरगा तालुक्यातील बलसुर येथे दे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या ग्राम शाखा क्रमांक अकरा ची स्थापना दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे होते .
तर शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या हस्ते फलकाचे पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले त्रिशरण पंचशील घेऊन फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम ब्रह्मानंद गायकवाड केराताई गायकवाड विद्याताई कांबळे तालुका दक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष कदम ताई बोलत असताना म्हणाल्या की, प्रत्येक सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपले काम केले पाहिजे भारतीय बौद्ध महासभा ही संस्था देशपातळीवरती काम करत नसून ती जगामध्ये काम करत आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या चोवीस शिबिरावरती काम करून आपला विकास करावा असे आव्हान कदम यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करत असताना बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून आपण आपला व आपल्या परिवाराचा आपल्या मुलांचा समाजाचा आणि गावाचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने पंचशीलाचे पालन करणे गरजेचे आहे पालन केल्याने आपला कोणीही दुश्मन होऊ शकत नाही त्यासाठी आपण पंचशील आपल्या आचरणात आणणे गरजेचे असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुरवसे यांनी व्यक्त केले.
बीएसआय २५ मिशन अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या ५६ ग्राम शाखा माध्यमातून स्थापन करण्यात आलेले शाखा क्रमांक अकरा च्या उदघाटन प्रसगी तालुका सरचिटणीस संगीता सोनकांबळे उषा गायकवाड धीरज कांबळे शिवराम अडसुळे मिलिंद कांबळे कमलाकर गायकवाड सुरज गायकवाड शिवाजी जाधव तसेच ग्राम शाखेचे पदाधिकारी नंदा गायकवाड, चंद्रकला गायकवाड सरोजा गायकवाड कविता गायकवाड बाई गायकवाड वनिता गायकवाड जयश्री गायकवाड नंदा शिवप्रसाद गायकवाड साळुबाई तानाजी गायकवाड जयश्री गायकवाड महादेवी गायकवाड कान्होपात्रा गायकवाड पद्माबाई गायकवाड महादेवी गायकवाड शाहूबाई सूर्यवंशी महानंदा कांबळे शिवनंदा गायकवाड मायावती कांबळे रुक्मिणी गायकवाड जयश्री सूर्यवंशी योगिता सातपुते राजरत्न गायकवाड प्रांजली गायकवाड सुमित गायकवाड महेश कांबळे अनिल कांबळे आनंद गायकवाड नितीन गायकवाड प्रदीप गायकवाड हरिभजन गायकवाड रोहित कांबळे अमित गायकवाड सागर सूर्यवंशी संगीता सूर्यवंशी प्रतिज्ञा सातपुते प्रतिभा राजपाल कांबळे प्रिया गायकवाड किसन गायकवाड मनीषा गायकवाड निर्जला गायकवाड आदी समाजातील सर्व बोध उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे होते तर कार्यक्रमाचे आभार माजी मुख्याध्यापक पि टी कांबळे यांनी मानले.







