Best News Portal Development Company In India

*दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कलदेव निबाळा येथे शाखेचे उदघाटन*

*दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कलदेव निबाळा येथे शाखेचे उदघाटन*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

(दि.१४)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भिमराव यशवतराव आबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये बी एस आय २५ मिशन अंतर्गत ग्राम शाखा स्थापना करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे दि. १३सप्टेंबर २०२६रोजी रात्री ८ वाजता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभेच्या ग्रामशाखा क्र १० या शाखेचे उदघाटन भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते फित कापुन फलकाचे उदघाटन करण्यात आले.
या वेळी प्रथम तथागत भगवान बुध्द व बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे रूपाचे पुजन करण्यात आले व त्रिशरण पचशिल घेऊन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे, तर प्रमुख पाहुणे जिल्हासघटक ब्रम्हानद गायकवाड, कलदेव निबाळा चे सभागृह नेते सुनिताताई पावशेर, तसेच मुख्याध्यापक पावशेरे गुरूजी, सरचिटणीस सगीता सोनकांबळे, सचिव उषा गायकवाड, बालाजी सूर्यवंशी शिवाजी जाधव, धिरज काबळे, मिलींद काबळे, कमलाकर गायकवाड आदीच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामशाखेचे उदघाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे सभागृह नेत्या सुनीता पावशेरे यांनी ग्राम शाखा उद्घाटन प्रसंगी सर्व शाखेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक पावशेरे गुरुजी यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे बोलत असताना म्हणाले की,बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मातृ संस्थेच्या माध्यमातून आपण दररोज आपल्यातील निर्गुण घालवण्यासाठी पंचशीलाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून २४ शिबिराच्या माध्यमातून आपण वेळोवेळी संस्थेच्या नियमाचे पालन करून शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या स्वतःच्या मुलांचे परिवाराचे समाजाचे कल्याण करण्यासाठी पंचशीलाचे पालन अष्टांगिक मार्ग आणि चार आर्य सत्य याचा स्वीकार करून आपण आपल्या जीवनाचे कल्याण करावे असे सांगितले. व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती यावेळीबौध्दाचार्य सुरवसे यांनी दिली.

प्रभावती गायकवाड,रेश्मा गायकवाड,अरुणा सूर्यवंशी,
सिद्धार्थ गायकवाड,
किशोर भालेराव, -विनोद गायकवाड, छायाबाई भालेराव
अनिता सूर्यवंशी, मंगल खरोसे
रमाबाई सूर्यवंशी,
लक्ष्मी सूर्यवंशी, संगीता सूर्यवंशी
शैलाबाई भालेराव,
बबिता सूर्यवंशी, अंजना सूर्यवंशी
हिरकणाबाई भालेराव,सुमन भालेराव, अंजना सूर्यवंशी ,आनंदी भोसले, सोनाक्षी गायकवाड, छाया भालेराव, उषा गायकवाड,सागर सुर्यवशी तसेच सर्व बौद्धउपासक उपासिका तसेच युवक यांची मोठी उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी भालेराव यांनी केले तर प्रस्ताविक सिद्धार्थ गायकवाड यांनी केले तर अध्यक्षीय समारोप तालुका दक्षबौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail