Best News Portal Development Company In India

अहिल्यादेवी होळकर मोफत एसटीपास विद्यार्थिनीना थेट शाळा व महाविद्यालयात जाऊन वाटप!

अहिल्यादेवी होळकर मोफत एसटीपास विद्यार्थिनीना थेट शाळा व महाविद्यालयात जाऊन वाटप!
——————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व हुतात्मा बाबूराव बोरगावकर विद्यालय साखर कारखाना नळदुर्ग येथील विद्यार्थिनींना बसस्थानक नळदुर्ग चे वाहतूक नियंत्रण अनिल हांडे, वहाक नेताजी मुळे, व काशिनाथ कुंभार आदीनी थेट शाळेत व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींना द्वितीय सत्राचे मोफत एसटी प्रवास पास वाटप केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यात शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकरीता अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पास ही एक नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

त्या अनुसंगाने राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वहातुक अधिकारी मधुरा जाधवर मॅडम, तुळजापूर अगार प्रमुख महेश रामपुरे, अकाउंटट बामनकर वहातुक नियंत्रक पाचंगे, महेश डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजने अंतर्गत नळदुर्ग बसस्थानकाचे वहातुक नियंत्रक अनिल हंडे, वहाक नेताजी मुळे,काशिनाथ कुंभार आदीनी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील २२२ व हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालय साखर कारखाना नळदुर्ग येथील ११८ विद्यार्थीनीना थेट त्यांच्या महाविद्यालया व शाळेत जावून मोफत एसटी पास चे वाटप केले.
.
एसटी महामंडळाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सुर्वत्र कौतुक होत असून पालक, शिक्षक विद्यार्थ्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail