Best News Portal Development Company In India

दुष्काळात बळीराजाला तातडीचा दिलासा! पीक पाहणी प्रयोग आता सप्टेंबरमध्येच; टँकर आणि उजनीच्या पाण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील अहोरात्र मैदानात!

दुष्काळात बळीराजाला तातडीचा दिलासा! पीक पाहणी प्रयोग आता सप्टेंबरमध्येच; टँकर आणि उजनीच्या पाण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील अहोरात्र मैदानात!

तुळजापूर प्रतिनिधी:-​ जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन व सरकार पातळीवर दररोज पाठपुरावा केला जात आहे.

दुष्काळ निवारणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व उपाययोजना खालीलप्रमाणे-
​पीक कापणी प्रयोगात मोठा बदल- पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यातच घेण्याचा धोरणात्मक निर्णय; ज्यामुळे पीक विमयाची रक्कम व भरपाई वेगाने मिळण्यास मदत होईल.
​मदत आणि अनुदानाचा वेगाने पाठपुरावा . गावागावांत पंचनामे, दुष्काळी मदत, अग्रीम (ॲडव्हान्स) अनुदान आणि पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू.

​पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय- पाणीटंचाई भासणाऱ्या सर्व संवेदनशील भागांत तातडीने टँकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश.
​उजनीचे पाणी जिल्ह्यात आणण्याचे नियोजन: टंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनीचे पाणी जिल्ह्यात आणण्याच्या कामाचा रोजच्या रोज गांभीर्याने आढावा.
​
“शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आमची प्राथमिकता आहे. जिल्ह्यातील सर्व प्रश्न आणि अडचणी पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत आमचा हा पाठपुरावा अविरत सुरूच राहील!”
​— आ. राणाजगजितसिंह पाटील.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india