Best News Portal Development Company In India

गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे अन् नियमांची पायमल्ली महाग पडली! धाराशिवमध्ये ३ डॉल्बी ऑपरेटर्सवर पोलिसांची मोठी कारवाई!

गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे अन् नियमांची पायमल्ली महाग पडली! धाराशिवमध्ये ३ डॉल्बी ऑपरेटर्सवर पोलिसांची मोठी कारवाई!

तुळजापूर प्रतिनिधी;-
गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाजात डॉल्बी/डीजे सिस्टीम वाजवणाऱ्या आणि सार्वजनिक सुरक्षेस धोका निर्माण करणाऱ्या तीन डॉल्बी सिस्टीम ऑपरेटर्सवर धाराशिव पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक मॅडम रितु खोखर यांच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​कारवाई झालेल्या आरोपींची नावे-
​सचिन शंकर शिंदे (वय ३८ वर्षे, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
​यशराज बाबासाहेब गाठे (रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव)
​पोपट रावसाहेब पवार (वय ४४ वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव)
​
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान सदर डॉल्बी चालकांनी पारंपारिक वाद्यांचा वापर न करता आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
​अपघाताचा धोका: साऊंड सिस्टीमची वाहनावरील आरास क्षमतेपेक्षा जास्त रुंदीची आणि अती उंचीवर लावली होती. ही आरास रस्त्यावरील जिवंत विजेच्या तारांना लागून गणेशमूर्तीचे नुकसान होण्याची आणि मोठा अपघात घडण्याची थेट शक्यता निर्माण झाली होती.

​सार्वजनिक रहदारीस अडथळा- अस्ताव्यस्त आणि अवाढव्य रचनेमुळे सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
​कर्णकर्कश आवाज: ठरवून दिलेल्या ध्वनी तीव्रतेच्या मर्यादेचे उल्लंघन करत अत्यंत मोठा आणि कानाचे पडदे फाडणारा आवाज ठेवण्यात आला होता.

पोलीस प्रशासनाच्या आदेशाचा अवमान करणे आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी खालील कडक कलमांनुसार गुन्हे नोंदवले आहेत:
​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम २२३, २८९, २९२, २९३ सह ३(५)
​पर्यावरण संरक्षण अधिनियम: कलम ३ व १५
​ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम २०००: कलम ३, ४, ५ आणि ६

​गणेशोत्सव काळात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियमावली जारी केली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलल्याने नियमांची पायमल्ली करणाऱ्या डीजे चालकांचे आणि आयोजकांचे धाबे दणाणले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india