Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये ७८ वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा; तहसीलदार माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण!

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये ७८ वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा; तहसीलदार माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. हैदराबाद संस्थानाच्या अन्यायी राजवटीतून मुक्त होऊन मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाल्याच्या या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून मंदिर संस्थानच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​याप्रसंगी तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर उपस्थितांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील अमर हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

​या सोहळ्यास पोलिस निरीक्षक बालाजी येवते, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) प्रवीण अमृतराव आणि सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

​याशिवाय धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विविध अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांनी परस्परांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail