Best News Portal Development Company In India

तुळजापूर: महाद्वार चौक येथील ऐतिहासिक ‘रणसम्राट कबड्डी संघा’च्या वतीने भव्य उपक्रम; बाप्पाला अर्पण केला. २१ तोळ्यांचा चांदीचा हार!

तुळजापूर: महाद्वार चौक येथील ऐतिहासिक ‘रणसम्राट कबड्डी संघा’च्या वतीने भव्य उपक्रम; बाप्पाला अर्पण केला. २१ तोळ्यांचा चांदीचा हार!
​महाआरोग्य शिबीर आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन; १९४४ पासूनची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम.

​तुळजापूर  प्रतिनिधी:-
तुळजापूर येथील महाद्वार चौक परिसरातील सन १९४४ पासूनची उज्ज्वल व ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या ‘रणसम्राट कबड्डी संघ’ यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक, वैद्यकीय आणि धार्मिक कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या नूतन कार्यकारिणीने २०२६ च्या उत्सवासाठी भव्य कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर केली आहे.

​बाप्पाच्या चरणी २१ तोळ्यांचा चांदीचा हार!
​यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे, नवसपूर्ती निमित्त रणसम्राट कबड्डी संघाचे माजी अध्यक्ष अक्षय दिलीपराव करडे यांच्यातर्फे श्री गणपती बाप्पाच्या चरणी २१ तोळ्याचा आकर्षक चांदीचा हार भक्तिभावाने अर्पण करण्यात आला आहे. करडे यांच्या या दातृत्वामुळे संघ परिवारात व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

​कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा-
​रविवार, २० सप्टेंबर २०२६ — महाआरोग्य शिबीर
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रविवार, दि. २०/०९/२०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत भव्य ‘महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे.

​बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ — अथर्वशीर्ष पठन
धार्मिक कार्यक्रमांतर्गत बुधवार, दि. २३/०९/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते ७:३० या वेळेत ‘श्री अथर्वशीर्ष पठन’ हा भक्तिमय कार्यक्रम संपन्न होणार आहे.
​रणसम्राट कबड्डी संघ (२०२६) कार्यकारिणी:
​या सोहळ्याचे व सर्व उपक्रमांचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यकारिणी कार्यरत आहे.
​अध्यक्ष- ज्ञानेश्वर बाळासाहेब क्षीरसागर
​उपाध्यक्ष- आशिष सोजी, प्रद्युम्न कदम
​सचिव- ओम दरेकर, राजवीर कदम
​विशेष सहकार्य- माजी अध्यक्ष अक्षय दिलीपराव करडे

​उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन –
१९४४ सालापासून क्रीडा व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या ऐतिहासिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीर व अथर्वशीर्ष पठणाचा तुळजापूर परिसरातील नागरिक, भाविक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर व रणसम्राट कबड्डी संघ, महाद्वार चौक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail