उमरगा-लोहारा तालुका दुष्काळ जाहीर करा,घोषणा नको, उपाययोजना चालू करा-डॉ. रामलिंग पुराणे
बसव प्रतिष्ठानची शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी सार्थ हाक..
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.)१७, पावसाआभावी उमरगा लोहारा तालुक्यातील खरीप पिके करपून गेले असून शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात आहे, उमरगा लोहारा तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करा,घोषणा नको, उपाय योजना राबवा असे विनंती निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान डॉ. रामलिंग पुराणे यांनी ई-मेल च्या माध्यमातून केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील ७ मंडळे – उमरगा, नारंगवाडी, मुळज, दाळींब, मुरूम,बलसुर, बेडगा या मंडळातील ७५ हजार हेक्टर शेती पैकी ७० हजार हेक्टर शेतीत ९३ टक्के पेरणी झाली आहे तर लोहारा तालुक्यातील ४ मंडळे – लोहारा, जेवळी, धानुरी, माकणी या महसूल मंडळात ४४०४५ हेक्टर पैकी ४१५३९ हेक्टर पेरणी – ९४ टक्के पेरणी झाले असून जवळपास सर्वच पीक पावसाआभावी करपून गेले आहेत.
उमरगा-लोहारा तालुक्यातील आर्थिक उलाढाल हे शेतीवर अवलंबुन आहे, पावसाआभावी शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती झाली आहे, काहींनी पीक विमा भरली आहेत तर काहींनी पैसे आभावी पीक विमा पण नाही भरले. सद्याची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता बाजार पेठा ठप्प झाल्या आहेत.
एकंदरीत पैशेवारीतही त्याचा परिणाम झाला असून, सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांचा हातातील खरीप पीक पूर्णपणे गेला आहे त्यामुळे पुढील रब्बी पिकाचे पेरणी किंवा उदरनिर्वाह साठी, आपल्या पाल्याच्या पालनपोषण, शिक्षण, आपल्या जणांवरांच्या चारा पाणी साठी झुंज देत आहेत. मा. मंत्री महोदयांना आम्ही या पत्राद्वारे खालील मागण्यानुसार उचित कारवाई करून शेतकरी बांधवाना न्याय द्यावा असे निवेदनात म्हंटले आहेत.
मागण्या –
१. उमरगा -लोहारा तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करून उपाययोजना चालू करा.
२. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयाची सरसकट आर्थिक मदत करा.
३. अग्रीम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
४. दुष्काळ परिस्थिती ठरवनाऱ्या शासन नियमावलीच्या अटीत शिथिलता आणून शेतकऱ्यांना सहानभूती दाखवावी.
५. राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका,पतसंस्था यांनी कर्ज वसुलीसाठी सक्ती करु नये यां संदर्भात सरकार मार्फत निर्देश देण्यात यावे.
६. पावसाआभावी खरीप पिके करपून गेले, रब्बीचे पण शाश्वती नसून त्या अनुषंगाने वरील मागणीचा समावेश करून तात्काळ परिस्थिती पूर्व उपाय योजना राबवावे.
७. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
८. शेतसारा माफ करावा.
९. रब्बी पेरणीसाठी बी-बियाणे सरसकट शेतकऱ्यांना मोफत द्यावे.
१०. जणांवरासाठी तात्काळ चारा छावण्या उभी करावेत.
११. नागरिकांसाठी पाणी प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपाय योजना राबवाव्यात.
स्टेटमेंट –
उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी पावसाआभावी कठीण परिस्थितीला सामोरे जात असून, सरकारने आता पाहणी, पंचनामा मध्ये वेळ न घालवता तात्काळ दुष्काळ जाहीर करून उपाय योजना राबवायला सुरुवात करावे, व याच पार्श्वभूमीवर रब्बी पिकासाठी पण पूर्व तयारी करावी.नागरिकांचे मूलभूत सुविधा पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन तयारीला लागावे.
– डॉ.रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान.






