Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार!

नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार!
————————————————–

नळदुर्ग (एस. के.गायकवाड ):
नळदुर्ग ता. तुळजापूर येथे ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्सहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.

येथी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्याल आणि शहरातील सर्व शाळेत, नगरपरिषद आदी ठिकाणी राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.असून येथील ऐतिहासिक किल्ल्यात ही नळदुर्ग अप्पर तहसीलदार यांच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा येथे सत्कार करण्यात आला.

. मरठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दि.१७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य सेनानीच्या वारसदार पुत्रांचा सौ.अर्चनाताई पाटील, महिला बचत गट भवानीनगर नळदुर्ग अध्यक्षा सिमंताबाई महादेव हांडे, तसेच नळदुर्ग चे तहसीलदार प्रमोद गायकवाड ,मंडळ निरिक्षक,पवार साहेब , महसूल अधिकारी,नागेश गायकवाड,महसूल वरीष्ठ लिपिक, समाधान पोतरे,नायब तहसीलदार, चौधरी ,नळदुर्ग पो.सब इन्स्पेक्टर अन्वर सय्यद, नगराध्यक्ष बसवराज धरणे, उप नगराध्यक्ष,नय्यर पाशा जहागिरदार,पुरातत्व खात्याचेही किल्लेदार नागनाथ गवळी,दत्तात्रय घोडके व मिथिलेश घोडके आणि सहकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य सेनानी प्रतिष्ठान नळदुर्ग शहर अध्यक्ष देवानंद मच्छिंद्र बनसोडे,व वारसदार, विकास वैद्य,आपू स्वामी, मच्छिंद्र कोणे, मोहसीन फुलारी, रविंद्र होरटीकर, मुकुंद भूमकर, आणि सर्व स्वातंत्र्य सेनानी वारसांच्या मुलांना प्रशस्तीपत्र देऊन अर्चनाताई पाटील, महीला बचत गटाच्या अध्यक्षा सिमींताबाई महादेव हांडे व मुलगा अनिल महादेव हांडे,एस.टीमहामंडळ नळदुर्ग शहर चे वाहतूक नियंत्रक यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी आपले घर येथील विद्यार्थी विद्यार्थीनी आणि शिक्षक तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थीनी व नळदुर्ग शहरातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थितीत होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail