Best News Portal Development Company In India

वागदरी येथे एक दिवशी धम्म संस्कार शिबिराचे आयोजन : भदन्त धम्मसार थेरो शिबिराला मार्गदर्शन करणार

वागदरी येथे एक दिवशी धम्म संस्कार शिबिराचे आयोजन : भदन्त धम्मसार थेरो शिबिराला मार्गदर्शन करणार
———————————————————-

नळदुर्ग (एस. के.गायकवाड ):
वर्षावास निमित्ताने वागदरी तालुका तुळजापूर येथे दि. २० सपेंबर २०२६ वार रविवार रोजी एक दिवशीय आनापान ध्यान व धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तक्षशिला व संघमित्रा बुद्ध विहार किल्लारी तालुका औसा येथील पूज्य भदन्त धम्मसार थेरो यांचे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

. दरवर्षी आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हा तीन महिन्याचा काळ बौद्ध धम्मात वर्षावासाचा काळ म्हणून पाळला जातो वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये धम्म प्रचारक आपापल्या गावी बुद्ध विहारात, समाज मंदिरात बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य करतात त्या निमित्ताने बौद्ध बांधव आपापल्या गावी आपापल्या परीने कार्यक्रमाचे आयोजन करतात.

. धम्माची साधना करुणा आणि आत्मविश्वासाचा पावन काळ म्हणजेच वर्षावास होय या निमित्ताने पंचशील बुद्ध विहार समिती,भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, बी.आर.तरुण मंडळ व समस्त बौद्ध उपासक उपासिका वागदरी ता. तुळजापूर यांच्या वतीने रविवार दिनांक २० सप्टेंबर २o२६ रोजी एक दिवशीय अनापान ध्यान व धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

. या शिबिराला रविवार दि.२० सप्टेबर २o२६ रोजी सकाळी ठिक ९.oo वाजता सुरुवात होणार असून हे शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. बौद्ध धम्म हा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी तत्त्वावर आधारलेला असून प्रत्येक तत्व सत्यता व सदगुणांने भरभरून आहे. मनुष्याने अकुशल कर्म करू नये,सदैव कुशल व सतकर्म करत राहावे.नेहमी चित्ताला निर्मळ व परिशुद्ध करत राहावे हेच बुद्ध शासन होय.म्हणून तयागत भगवान बुद्धांचा प्रज्ञा! शील! करुणा! हा उपदेश समजून घेण्यासाठी वागदरी येथे एक दिवसीय आनापान ध्यान व धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

. तरी वागदरी व परिसरातील तमाम बौद्ध बांधवांनी युवक युवतीनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून सहकार्य करावे असे आवाहन पंचशील बुद्ध विहार समिती,भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, बि.आर.तरुण मंडळ व समस्त बौद्ध बांधव वागदरी च्या वतीने करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail