Best News Portal Development Company In India

*मनुष्याने पंचशील स्वीकारल्यास कधीही आरोग्य बिघडणार नाही- बौद्धाचार्य उमेश सुरवसे*

*मनुष्याने पंचशील स्वीकारल्यास कधीही आरोग्य बिघडणार नाही- बौद्धाचार्य उमेश सुरवसे*

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
(दि.१८) भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे मनुष्याने पंचशील स्वीकारल्यास कधीही आरोग्य बिघडणार नाही असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे कवठा येथील वर्षावास कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभेने ठरवून दिलेल्या ३२ विषयांपैकी दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी भगवान बुद्धांचे आरोग्यशास्त्र या विषयावरती बोलत असताना व्यक्त केले.

यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शोभा सुरवसे, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला केंद्राचे अध्यक्ष दिलीप सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले व भंतेसुमंगल यांना पंचशीला साठी याचना करण्यात आली व भंते सुमंगल यांनी पंचशील दिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे होते तर, भन्ते सुमंगल, जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड, सरचिटणीस संगीता ताई सोनकांबळे, उषाताई गायकवाड धीरज कांबळे मिलिंद कांबळे शिवाजी जाधव कमलाकर गायकवाड, बालाजी गायकवाड तसेच संतोष सुरवसे राजेंद्र सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन बौद्ध उपासक दिलीप सुरवसे यांनी केले.

यावेळी पुढे बोलत असताना बौध्दाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आरोग्यशास्त्रामध्ये पंचशीलातील प्रत्येक तत्त्वांमध्ये प्राणीहिंसा न करणे कोणत्याही सजीवाला किंवा प्राण्याला दुखापत न करणे किंवा मारू नये.चोरी न करणे न विचारता किंवा परवानगीशिवाय दुसऱ्याची वस्तू न घेणे,खोटे न बोलणे नेहमी सत्य बोलावे आणि फसवणूक करू नये,वाईट आचरण न करणे,कामसुख किंवा लैंगिक बाबींमध्ये अनाचार किंवा गैरव्यवहार न करणे,मादक पदार्थाचे सेवन न करणे मद्य किंवा इतर कोणत्याही मानसाला भ्रमिष्ट करणाऱ्या मादक पदार्थांचे सेवन न करणे, अदी विषयावरती ज्या मनुष्याला विचार करून आपल्या आचरणामध्ये पंचशील स्वीकारले आहे अशा मनुष्याचे आरोग्य हे कायमस्वरूपी निरोगी राहते,या पंचशीला चा अवलंब केल्यामुळे येणारे दुःख येणार नाही त्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून भगवान बुद्धाने दिलेला आरोग्यमंत्र म्हणजे पंचशील आहे असे मत तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे व्यक्त केले.

यावेळी सम्राट बुद्ध विहाराच्या समोर पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण भंते सुमंगल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गीता कांबळे, पौर्णिमा कांबळे मालनबाई कांबळे कुसुम कांबळे प्रभावती कांबळे कावेरी सुरवसे मुद्रिका कांबळे जयश्री कांबळे शोभा सुरवसे नंदा कांबळे शारदा सुरवसे सुशीला कांबळे शिवकन्या कांबळे पंचशीला कांबळे शालू कांबळे वैजंता बाई कांबळे, शोभा कांबळे अरुणा कांबळे लता कांबळे, श्रीदेवी कांबळे लोचना कांबळे सविता कांबळे सोनाली कांबळे वनिता कांबळे रंजना कांबळे रुक्मिणी कांबळे पंडित कांबळे छाया कांबळे बाळासाहेब कांबळे महादेव कांबळे तसेच सर्व कवठा येथील उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india