Best News Portal Development Company In India

नळदुर्ग व परिसरात गौरी लक्ष्मीचे घरोघरी उत्साहात स्वागत!

नळदुर्ग व परिसरात गौरी लक्ष्मीचे घरोघरी उत्साहात स्वागत!
_________________________________

नळदुर्ग (एस. के.गायकवाड ):
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया! असा गजरामध्ये नळदुर्ग व परिसरामध्ये विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले.
त्या पठोपाठ दि.१८सप्टेंबर रोजी गौरी लक्ष्मीचे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,वागदरी,गुजनूर शहापूर दहिटणा व परिसरात
भक्तिमय वातावरणात गौरी लक्ष्मीचे घरोघरी स्वागत करण्यात आले.

गौरी लक्ष्मीच्या स्वागता पूर्वी घरादाराची स्वच्छता करण्यात येते. विशेषतःमहिलांची लक्ष्मीच्या स्वागतासाठी मोठी लगबग सुरू असते स्टेजची मांडणी करणे,लक्ष्मीचे मुखवटे बसवणे, सुंदर साडी नेसून दाग दागिन्याने मडवणे व स्टेज वरती अनेक प्रकारच्या आकर्षक शोभेच्या वस्तू ठेवणे, विविध प्रकारचे गोड पदार्थ गौरी लक्ष्मी पुढे ठेवण्यात महिलांचा मोठा हातखंड असतो.

. महिला कडून आपापल्या परीने लक्ष्मीची सजावट केली जाते आकर्षक लायटिंग अनेक देखाव्याच्या वस्तू लाडू बुंदी सह पुरणपोळी शेंगदाण्याची पोळी वगैरे पदार्थ या निमित्ताने केले जातात.काही जवळच्या लोकांना भोजनदान दिले जाते. सासरवासातून आपल्या मुली माहेरी आल्यनंतर जो आनंद मिळतो तोच आनंद या निमित्ताने मिळतो.मुलीचे प्रतिक म्हणून गौरी लक्ष्मी कडे पाहीले जात.

. माहेरात उत्साही वातावरणात स्वागत करून गौरी लक्ष्मीला प्रसन्न करण्यात महिलावर्ग मग्न असतात सकाळपासूनच ज्यांच्या घरी लक्ष्मी बसलेली आहे त्यांच्या घरी लक्ष्मी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गावातील महिला पुरुष लहान मुलांची वर्दळ असते. प्रत्येकाच्या घरी जाऊन लक्ष्मी चे मनोभावे दर्शन घेतात.महिला एकमेकींना कुंकू हळद लावतात. या निमित्ताने दिवसभर गावात आनंदी व उत्साही वातावरण पाहावयास मिळते.

दुसऱ्या दिवशी गावातील सुवासिनी महिलांच्या हस्ते गाठी घेऊन गौरी लक्ष्मीला निरोप दिला जातो हिंदू धर्मात हा सन अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा मानला जातो.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail