रणसम्राट कबड्डी संघाचा आरोग्यदायी समाज, समृद्ध तुळजापूर! २० सप्टेंबरला ‘भव्य दिव्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीरा’चे आयोजन करण्यात आले!
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मोफत वैद्यकीय तपासणीसह ‘आयुष्मान कार्ड’ सुविधा एकाच छताखाली!
तुळजापूर प्रतिनिधी;-
“निरोगी नागरिक… निरोगी तुळजापूर… मजबूत भविष्य” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून रोटरी क्लब तुळजापूर आणि रणसम्राट कबड्डी संघ (स्थापना १९४४) यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापुरात ‘भव्य दिव्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीरा’चे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:०० या वेळेत पार पडले आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत श्रीकृष्ण ब्लड सेंटर संचलित कुतवळ ब्लड स्टोरेज सेंटर, तुळजापूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये नागरिकांसाठी संपूर्ण तपासणी मोफत केली असून खालील महत्त्वाच्या चाचण्या व सेवा पुरविण्यात आल्या होत्या.
सामान्य तपासण्या: बी.पी. तपासणी, शुगर तपासणी, स्त्री रोग तपासणी, हृदयरोग तपासणी आणि थायरॉईड तपासणी.
सर्व्हेलन्स व सर्व रोग निदान: तज्ज्ञ डॉ. श्रीराम नरवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत रुग्णांची सखोल तपासणी.
अस्थिरोग (हाडांचे विकार)- अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विनोद बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांच्या विकारांची तपासणी व मोफत मार्गदर्शन.
नेत्र तपासणी व उपचार- नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गीतांजली माने-थोरात, डॉ. श्रीकांत थोरात व डॉ. जयश्री किरण थोरात-पाटील यांच्या उपस्थितीत डोळ्यांची सखोल तपासणी व मार्गदर्शन.
विशेष सोय- पात्र नागरिकांना ‘आयुष्मान कार्ड’ मोफत काढून देण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात पुढील गरजू व्यक्तींनी लाभ घेतला.
रक्तदान एकूण 31 व्यक्ती,
नेत्र तपासणी 78 व्यक्ती,
आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड 55
तुळजापूर शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा आणि रक्तदान शिबीराचा लाभ घेतला. याप्रसंगी रो. अमर दाजी हंगरगेकर (अध्यक्ष), रो. प्रशांत अपराध (सह. प्रांतपाल), रो. संजीव मैंदर्गे (सचिव), रो. डॉ. हिम्मत गाटे (डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस) तसेच श्री रणसम्राट गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बाळासाहेब क्षीरसागर व सर्व सदस्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तुळजापूर पंचक्रोशीतून रणसम्राट कबड्डी संघाच्या या सदउपयोगी कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.









