Best News Portal Development Company In India

जो स्वतःच मन जिंकतो मनावर ताबा ठेवतो तोच खरं सुखी समाधानी जिवन जगतो हीच तथागत भगवान बुद्धांची शिकवण आहे : भदन्त धम्मसार थेरो!

जो स्वतःच मन जिंकतो मनावर ताबा ठेवतो तोच खरं सुखी समाधानी जिवन जगतो हीच तथागत भगवान बुद्धांची शिकवण आहे : भदन्त धम्मसार थेरो
———————————————————–

नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
एक वेळस जग जिंकन सोप आहे.पण स्वतःच मन जिंकन खुप आवघड आहे.जो स्वतःच मन जिंकतो मनावर ताबा ठेवतो तोच खरं सुखी समाधानी जिवन जगतो.हीच तथागत भगवान बुध्दांची शिकवण आहे.तेंव्हा माणसाने नेहमी आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे असे प्रतिपादन पुज्य भदन्त धम्मसार थेरो यनी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.

. पंचशील बुध्द विहार समिती,भारतीय बौध्द महासभा ग्रामशाखा, डॉ.बाबासाहेब आबेडकर जयंती उत्सव कमिटी, बि.आर.तरुण मंङळ, व समस्त बौध्द बांधव वागदरी ता.तुळजापूर यांच्या वतीने, तक्षशीला व संघमित्रा बुध्द विहार किल्लारी ता.औसा येथिल पुज्य भदन्त धम्मसार थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वागदरी येते वर्षावास निमित्त रविवार दि.२o सप्टेंबर २o२६ रोजी एक दिवसीय अनापान ध्यान व धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला मार्गदर्शन करताना भदन्त धम्मसार थेरो बोलत होते.पुढे बोलतान त्यानी ध्यानसाधना,तथागत गौतम बुद्ध यानी सांगतलेली दान पारिमिता दानाचे महात्व व मानवी जीवनाचे नितीमूल्य या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तर प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलतान प्रा.डी.डी.मस्के म्हणाले की, तथागत गौतम बुद्ध यानी दिलेल्या पंचशील तत्वाचे प्रत्येकानी काटेकोर पणे पालण केल्यास मनावर ताबा ठेवून सुखी समाधानी जिवन जगता येते. यावेळी रिपाइं (आठवले)चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे यांचेही शुभेच्छा पर भाषणे झाली

. या निमित्ताने भदन्त धम्मसार थेरो यांचे भिमनगर वागदरी येथे आगमन होताच समस्त बौध्द बांधवाच्या वतीने फूलांचा वर्षाव करून
त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

प्रारंभी तथागत.गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य प्रतीमांचे पुजन पूज्य भदंत धम्मसार थेरो,प्रा.डी.डी. मस्के, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे,माजी सरपंच नागनाथ बनसोडे, कमिटी अध्यक्ष महादेव वाघमारे, सचिव चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्याआले. या नंतर भदन्त धम्मसार थेरो यानी उपस्थित सर्व उपासक उपासिकेना त्रिशरण पंचशिल दिले अर्थात सामुदायिक रित्या बुध्द वंदना घेऊन शिबिराला सुरवात करण्यात आली.या प्रसंगी येथिल जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक वाघमारे व कुटुंबीयांकडून पूज्य भदंत धम्मसार थेरो यांना चिवर दान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं(आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यानी केले.यावेळी रिपाइं (आठवले)चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,युवा कार्यकर्ते प्रा.अशांक मस्के,महिला कार्यकर्त्या काशिबाई मस्के सह पंचशील बुद्ध विहार कमिटी वागररी,भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी व बि. आर.तरुण मंडळ वागदरी चे सर्व पदाधिकारी सदस्य, महिला कार्यकर्त्या,युवा कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail