धाराशिव: राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. किरण झारकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून विशेष सत्कार!
तुळजापूर प्रतिनिधी:-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) धाराशिव येथील डॉ. किरण झारकर साहेब यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
डॉ. झारकर यांच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आयटीआयच्या माध्यमातून शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. झारकर यांना हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर रिपाईच्या (आठवले) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीची दखल घेत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याला रिपाईचे महाराष्ट्र राज्य जॉइंट सेक्रेटरी मा. राजाभाऊ ओहाळ साहेब, जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य बिराजदार सर, रिपब्लिकन एम्प्लॉयमेंट फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष मा. भाऊसाहेब मस्के, युवक जिल्हाध्यक्ष मा. रणजित बनसोडे, एल. एल. शिंगाडे ताई, राऊत सर, वाळा ताई, सामाजिक कार्यकर्ते मा. संग्राम बनसोडे आणि महेंद्र जेठीथोर यांच्यासह रिपाईचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







