Best News Portal Development Company In India

*आत्मा आहे याला धम्मामध्ये थारा नाही बौद्धाचार्य उमेश सुरवसे*

*आत्मा आहे याला धम्मामध्ये थारा नाही बौद्धाचार्य उमेश सुरवसे*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

(दि.२३) भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जन्म घेतलेला मनुष्य प्राणी यांचा मृत्यू हा निश्चित होणार आहे तसेच जगामध्ये अनित्य पासुन आनात्माची अपेक्षा ठेवणे म्हणजेच स्वतःवरती दुःख ओढवून घेणे आहे त्यामुळे आत्मा आहे याला बौद्ध धम्मा मध्ये थारा नाही असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी व्यक्त केले.

या वेळी तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन बौद्धाचार्य उमेश सुरवसे, प्रा.अडसुळे, आयु कांबळे आयु कांबळे यांच्या हस्ते करून त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भिम स्मरण भीम स्तुती घेऊन अभिवादन करण्यात आले.या वेळी वर्षावास कार्यक्रम निमित्त भगवान बुध्द आणी त्याचा धम्म या ग्रथाचे वाचन आर्या सुरवसे यांनी केले.
येणेगुर येथील सिध्दार्थ बुद्ध विहार यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेने ठरवून दिलेल्या ३२ विषयांपैकी विषय – अनित्य अनात्म दुःख या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी केले.
पुढे बोलत असताना बौध्दाचार्य सुरवसे म्हणाले की, बौद्ध धम्माचा विचार म्हणजेच अनित्य अनात्म आणि दुःख याचा सार आहे आसे मत व्यक्त केले.
भारतीय बौध्द महासभा तालुकाशाखा उमरगा अतर्गत तालुक्यातील येणेगुर येथील सिध्दार्थ बुद्ध विहार येथे दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी वर्षावास कार्यक्रम व शाखा निर्मिती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रमाणे उपस्थित बौध्द उपासक उपासिका यांच्या मधुन शाखा निर्मिती करण्यात आली.
बुद्ध विहार येणेगुर यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामशाखा क्र. १२ अध्यक्ष अरुणा कांबळे, सरचिटणीस नितीन सुरवसे, कोषाध्यक्ष शीला मोरे, संस्कार विभाग उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, पर्यटन विभाग उपाध्यक्ष कल्पना कांबळे, महिला विभाग उपाध्यक्ष कविता सुरवसे, संरक्षण विभाग उपाध्यक्ष राघोबा गायकवाड, संस्कार सचिव सुनंदा सुरवसे पर्यटन सचिव सोपान सुरवसे महिला सचिव आशाबाई सुरवसे संरक्षण सचिव पप्पू सुरवसे संघटक अमोल सुरवसे प्रशांत साखरे धनराज गायकवाड बाळासाहेब गायकवाड आदी जनाची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भीम नगर येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail