Best News Portal Development Company In India

विद्यार्थ्यांनी खेळात सर्वगुणसंपन्न होणे काळाची गरज…. ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ….

विद्यार्थ्यांनी खेळात सर्वगुणसंपन्न होणे काळाची गरज…. ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ….

गोल्ड मेडल विजेते धिरज पवार व वीर कोंगुळवार यांचा सत्कार….

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवून विविध खेळांमध्ये सहभागी व्हावे. क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षणासोबत खेळातही सर्वगुणसंपन्न होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ यांनी केले.

उमरगा शहरातील जिवलगा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, गुंजोटी संचलित डॉ. रामानुजन प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी नागपूर येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. चि. धिरज लक्ष्मण पवार याने एकम लाठी क्रीडा प्रकारात, तर चि. वीर चैतन्य कोणगुलवार याने पंचम लाठी क्रीडा प्रकारात आपल्या गटातून खेळत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात भूमिपुत्र वाघ बोलत होते.

यावेळी भूमिपुत्र वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून क्रीडा क्षेत्राचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख, पत्रकार सचिन बिद्री व महेश अंबर यांनीही शालेय शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

देशपातळीवरील निवडीमुळे यशाला नवे बळ; राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लाठी या क्रीडा प्रकाराला भविष्यात मोठी संधी असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर पुढील स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून या खेळाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा धिरजचा संकल्प;
“नागपूर येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होऊन एकम लाठी क्रीडा प्रकारात मला गोल्ड मेडल मिळाले. या यशासाठी शाळेचे अध्यक्ष महेश अंबर व क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असा मनोदय गोल्ड मेडल विजेता चि. धिरज लक्ष्मण पवार याने व्यक्त केला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महेश अंबर, सचिव गुलाब माळी, प्रमुख मार्गदर्शक तथा माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, पत्रकार अंबादास जाधव, सचिन बिद्री, लक्ष्मण पवार, विकास गायकवाड, नसरोद्दीन फकीर, महादेव पाटील, राहुल थोरात, विशाल देशमुख, प्राचार्य युसूफ मुल्ला, अमोल पाटील, महेबुब पठाण तसेच विद्यार्थ्यांचे पालक सौ. भक्ती लक्ष्मण पवार व सौ. पूनम चैतन्य कोंगुळवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक गंगा अंबर, दुर्गाराणी बिद्री, श्रीनिधी गोडेकर, संध्या ममाळे, कांचन खंडाळकर, कल्याणी बबलादे, अश्विनी मुळे, उज्वला धुमाळ, प्राजक्ता गुरव, रंजना मुळे, मंजुश्री घोंगडे, स्वाती जेवळे व धनश्री अंबर यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दुर्गा बिद्री यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गंगा अंबर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india