Best News Portal Development Company In India

मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कारांचे वितरण!  

मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कारांचे वितरण!
तुळजापूर प्रतिनिधी:- देशातील नोकरशाहीची निवड परीक्षांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, सध्या परीक्षा प्रक्रिया आणि परीक्षांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, परीक्षा सुरळीत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, दत्ता मेहेत्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मुळे म्हणाले, स्वातंत्र्याची खरी फलनिष्पत्ती ही स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यात आहे. लोकशाहीत मोठ्या क्रांतीपेक्षा समाजाच्या विविध स्तरांवर सुरू असलेल्या छोट्या-छोट्या परिवर्तनाच्या प्रक्रिया अधिक महत्त्वाच्या आहेत.

पर्यावरण, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांत सकारात्मक काम करणारी माणसे हीच ‘सूक्ष्म क्रांतिकारक’ आहेत. त्यांच्या कार्याला सक्षम व्यवस्था आणि पूरक वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नोकरशाहीसमोरील अनेक आव्हाने कृत्रिमरीत्या निर्माण केली गेली असून, त्यामागे कायदेमंडळातील लोकप्रतिनिधींच्या गुणवत्तेत झालेली घसरण हेही एक कारण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पाच मान्यवरांचा ‘मराठवाडा भूषण’ने गौरवकार्यक्रमात मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव हनुमंत आरगुंडे, ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी, ज्येष्ठ साहित्यिक      म. शहाजिंदे, जेएनयूचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आवाड, नेत्रतज्ज्ञ डॉ. एकनाथ शेळके आणि शरद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india