Best News Portal Development Company In India

मोठी बातमी: कागदपत्रांची अट बाजूला ठेवा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा! आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

मोठी बातमी: कागदपत्रांची अट बाजूला ठेवा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा! आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे १००% नुकसान झाले असून सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पंचनामे करताना अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर धाराशिव-कलंब मतदारसंघाचे आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कागदपत्रांची अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
​
​कागदपत्रांची सक्ती: पंचनाम्यादरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID), आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, मोबाईल क्रमांक आणि जीओ टॅगिंग फोटो इत्यादी कागदपत्रे मागितली जात आहेत.
​शेतकऱ्यांना नाहक त्रास व भुर्दंड- आधीच दुष्काळामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना ही कागदपत्रे जमा करताना अनावश्यक अडचणी व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

​नेटवर्कची अडचण व मदतीपासून वंचित राहण्याची भीती- ग्रामीण भागात विशेषत- इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी अडचण असल्याने शेतकऱ्यांकडे आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे प्रत्यक्ष १००% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे अपूर्ण राहून ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
​पंचनाम्याचा मूळ उद्देश- पंचनाम्याचा मुख्य उद्देश प्रत्यक्ष झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे हा आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोणताही पात्र शेतकरी नोंदीपासून राहू नये, यासाठी प्रथम प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे पंचनामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
​
आमदारांची आक्रमक भूमिका-
​दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे १००% बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करताना कोणत्याही कागदपत्रांची अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी ठाम मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail