वर्षावास समारोप कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे : भदन्त धम्मसार थेरो
—————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील लातुर आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व श्रध्दा संपन्न बौध्द उपासक आणि उपासिका (बौध्द बांधव) यांनी दि.२५ ऑक्टोबर २०२६ वार रविवार रोजी सकाळी ठिक १०.०० वा.दरम्यान किल्लारी येथे आयोजित १२ व्या वर्षावास समारोप कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवहान भदन्त धम्मसार थेरो यानी केले आहे.
. भदंत धम्मसार थेरो गेल्या १२ वर्षा पासून दरवर्षी आषाढी पोर्णिमा ते आश्विनी पोर्णिमा म्हणजे वर्षा वासाच्या काळात तिन महिने धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करतात.या वर्षी त्यांनी तिन महिन्यांच्या वर्षावास काळात येणाऱ्या प्रतयेक रविवारी लातूर व धाराशिव जिल्ह्यातील काही गावांमध्ये एक दिवसिय अनापान ध्यान व धम्म संस्कार शिबिर घेवून आपला १२ वा वर्षास संपन्न केला असून या १२ व्या वर्षावास समारोपाच्य निमित्ताने.तक्षशिला बुद्ध विहार किल्लारी ता.औसा जिल्हा लातूर येथे तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांच्या प्रेरणेने,यावर्षीच्या ‘वर्षावास समारोप’ व (कठीण चिवर दान) सोहळ्याचे अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले आहे.
वर्षावास हा काळ धम्म श्रवण,सदाचार आणि आत्मपरीक्षणाचा असतो.या पवित्र काळाची यशस्वी सांगता करण्यासाठी विहाराच्या वतीने विशेष बुद्ध वंदना, धम्मदेसना आणि सामूहिक सुत्त पठण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या निमित्ताने पूज्य भदंत धम्मनाग महाथेरो हत्याळ, पूज्य भदंत सुमेध जी नागसेन खरोसा,पूज्य भदंत धम्मबोधि करडखेल,पूज्य भदंत सुमंगल कराळी, पूज्य भदंत संघानंद, सोलापूर,आदींची धम्म देशना होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री तथा विद्यमान विधान परिषद आमदार बसवराज पाटील,
माजी मंत्री नामदार संजय बनसोडे विद्यमान आमदार उदगीर विधानसभा,विनोद खटके संस्थापक अध्यक्ष व्ही एस पॅंथर महाराष्ट्र राज्य,कैलास शिंदे माजी समाज कल्याण सभापती धाराशिव जिल्हा परिषद,दिलीप भालेराव माजी जिल्हा परिषद सदस्य,
आयुष्य मती गंगाबाई कोदळीकर(थोरात) पंचायत समिती सभापती औसा, आदींची उपस्थिती राहणार आहेत.
तरी दि.२५ऑक्टोबर २०२६ वार रविवार रोजी
सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत तक्षशिला बुद्ध विहार,तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथे समस्त बौद्ध उपासक उपासिका यानी मोठ्या संस्थेने उपस्थिती राहवे असे आवहान भदंत धम्मसार थेरो, स्वागत अध्यक्ष उप सरपंच युवराज गायकवाड सह बुध्द विहार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.





