Best News Portal Development Company In India

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे प्रयत्न करणार : नामदार रामदास आठवले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे प्रयत्न करणार : नामदार रामदास आठवले
——————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
भविष्यात दुष्काळाचा सामना करायचा असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प देश पातळी राबविणे. ही काळाची गरज आहे असून सध्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये भिषण दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे.शिवाय पर्जन्यमान एकदम कमी झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या हाताला लागणार नाहीत त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला असून जनावराच्या चारा पाण्याचा ही प्नश्न निर्माण झालेला आहे. तसेच भुमिहीन शेतमजुरांच्याही हाताला काम मिळत नाही.याचा सारासार विचार करून विचार करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे व राज्य सरकारकडे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार, तसेच शेतमजुरांच्या रिकाम्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार हमी सारख्या योजना प्रभावीपणे राबवून शेतमजूर कुटुंबांना आर्थिक मदतीची सोय करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्य मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी धाराशिव येथे आयोजित कोरडा दुष्काळ पत्रकार परिषदेत बोलतान केले.

दि. १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रेजी नामदार रामदासजी आठवले हे दुष्काळाची पहाणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असून दिनांक १७ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथिल पुष्पक हॉटेल सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने कोरडा दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नामदार रामदास आठवले हे पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतमजुरांना अधिक भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न तर करणारच आहे. परंतू या भिषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात मदत करणे गरजेचे आहे. विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था,संघटना व अनिल अंबानी,मुकेश अंबानी,किर्लोस्कर अशा मोठ्या उद्योगपती कडून या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना व शेत मजुरांना विविध प्रकारे मदत करणे काळाची गरज आहे.

सध्या चालू असलेल्या मत चोरी आंदोलना संदर्भात अभिजीत दिपके व राहुल गांधी यांच्या आंदोलना बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की भारतीय संविधानानुसार समाजाच्या न्यायिक प्रश्नावर आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार असून त्याबद्दल आपले काही मत नाही परंतु भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग यांना स्वतंत्र स्वायत्तेचा दर्जा दिलेला असल्यामुळे त्यांच्याकडून निपक्षपाती पणे पारदर्शक काम होणे अपेक्षित आहे.या बद्दल दुमत नाही परंतु
मतदार संशोधन प्रक्रिया (SIRI)मध्ये काही मयत लोकांची तर काही दोन-तीन ठिकाणी मतदार यादीत नाव असलेले किंवा आतापर्यंत कधीच मतदान न केलेले मतदार आहेत.त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यात चुकून एखाद्याचं नाव वगळल असेल तर ते नाव समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.त्यामुळे सर्व बाबीची शहानिशा होणे गरजेचे आहे.अभिजीत दिपके आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या अटकेबाबत विचारले असता परिस्थितीची गांभीर्यता ओळखून काही वेळेला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला असे निर्णय घ्यावे लागतात आम्ही सुद्धा दलित पॅंथरच्या माध्यमातून, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने केलेली आहेत करीत आहोत अनेक वेळा आम्हालाही अटक झालेली आहे तेव्हां या आटकेच आपण समर्थन करित नसून परिस्थितीनुसार घेतलेला हा पोलीस प्रशासनाचा निर्णय असावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजा भाऊ ओव्हाळ,महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय बनसोडे, जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष भागवत शिंदे,
सह जिल्ह्यातील तमाम रिपब्लिकन पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india