Best News Portal Development Company In India

अजित पवार यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राच्या गडाचा एक खंबीर बुरुज कोसळला ; नगरसेवक मारुती खारवे नळदुर्ग!

अजित दादा पवार यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राच्या गडाचा एक खंबीर बुरुज कोसळला : नगर सेवक मारुती खारवे
————————————————-
नळदुर्ग (प्रतिनिधी):
आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वा दरम्यान महाराष्ट्राचे कार्य कुशल खंबीर नेतृत्व तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघाताने बारामती विमानतळावर दुःखद निधन झाल्याची वार्ता वाऱ्या यासारखी महाराष्ट्रभर पसरली त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच सर्व जाती धर्मातील आणि पक्षातील कार्यकर्ते जनता
दुःख सागरात बुडाली असून महाराष्ट्राचे खंबीर व सर्वांना समान न्याय देणारे नेतृत्व हरवल्यातील अदरांजलीपर प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी
व्यक्त केल्या.
या निमित्ताने बोलताना नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे हे आपल्याआदरांजली पर भावना व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा मजबूत असा गड आहे आणि या गडाचा एक कणख बुरुज अजित दादा यांच्या निधनाने कोसळ आहे.त्यांच्या निधनामुळे आज संबंध महाराष्ट्रत शोककळा पसरली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस.के.गायकवाड म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकीय चळवळीतील एक धाडसी आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व अजित दादा यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड झालं असून महाराष्ट्रातील राजकीय चळवळीमध्ये फार मोठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे म्हणाले की एका कामाच्या निमित्ताने पाच सात वर्षांपूर्वी मी दादाची भेट मुंबईमध्ये घेतली होती.माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र शिंदे अशी ओळख करून देताच त्यांनी हस्तांदोलन केलं त्यांच्या दुःखत निधनाची वार्ता कळताच त्यादिवशी त्यानी केलेला त्यांच्या हाताचा स्पर्श क्षणात मला जाणवला खूप दुःख झालं असून एका न्यायिक नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे.अशा श्रध्दांजलीपर भावना त्यानी व्यक्त केल्य.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india