Best News Portal Development Company In India

उमरगा येथे मल्हार (दादा)पाटिल यांच्या हस्ते तेरणा जनसेवा आरोग्य केंद्राचे उद्घाटन!

उमरगा येथे मल्हार (दादा)पाटिल यांच्या हस्ते तेरणा जनसेवा आरोग्य केंद्राचे उद्घाटन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.१५) रोजी मल्हार( दादा) पाटिल यांनी उमरगा सह तुरोरी जिल्हा परिषद मतदार संघातील गवांना भेटी देवुन अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली.
सकाळी १० वाजता उमरगा येथे तेरणा जनसेवा आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले तदनंतर तुरोरी येथील हणुमान चौकातील छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन तरोरी येथील प्रमुख मार्गावरुन भव्य अशी रँली काढण्यात आली.
तदनंतर भिमनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मल्हार पाटिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व भिमनगर सभागृहात महिला मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच तुरोरी येथील श्री. सिध्ययप्पा देवस्थान मंदिरासाठी ५ लाख रुपये ची देणगी मल्हार दादा पाटिल यांच्या कडुन देण्यात आली.
श्री मल्हार दादा यांनी श्री सिध्ययप्पा महाराज यांचे दर्शन घेऊन महादेवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी उपसरपंच पंडित शिंदे, बालाजी माणिकवार, विजयकुमार शिंदे, कमलाकर जाधव सह ग्रामस्थ व सिध्ययप्पा भक्तांनी मंदिराच्या बांधकामाची मागणी केलीअसता
भाविकांच्या या भावनेचा सन्मान करत श्री .सिध्ययप्पा मंदिराच्या बांधकामासाठी मल्हार दादा यांच्यावतीने ५ लाखांची देणगी जाहीर केली आणि धनादेश मंदिराच्या पुज्य तिर्थय्या स्वामी महाराज यांच्याकडे व लागलीच विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आले.
तुरोरी स्वामी समर्थ केंद्राला २लाखाचा निधि देण्यात आला.
धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अशा पवित्र कार्यात सहभागी होता आले, याचा मनस्वी आनंद भाविक भक्तांची व्यक्त करण्यात आले
तदनंतर तुरोरी येथीलडॉ. विजय शिंदे यांच्या दवाखान्यात डॉ .विजयकुमार अण्णाराव शिंदे,विक्रांत विजयकुमार शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुपारी १वाजता आष्टा जहागीर येथि संतयोगी दामोदर महाराज मठ संस्थान येथे श्री.चे दर्शन घेण्यात आले यावेळी मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यानी मल्हार पाटिल यांचा यथोचित सत्कार करुन सन्मानित करून आशिर्वाद देण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,बांधकाम व अर्थ सभापती श्री. सिद्धेश्वर कोरे, पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे,जि.प.सदस्य शहाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चनाताई जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती श्री. युवराज (दाजी) जाधव, जि.प.सदस्य अप्पासाहेब पाटिल, भा.ज.पा.तालुका अध्यक्ष शिद्धेश्वर माने, भाजपा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा पुजा माणिकवार,ग्रामपंचायत सदस्य अशोकराव जाधव, शशिकांत बाळेकर ज्ञानेश्वर पाटिल, विजयकुमार भोसले,अतुल पवार, अँड.सुशिलकुमार शिदे, विठ्ठल चिकुंद्रे अदिसहप्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बालाजी माणिकवार यांनी तर आभार माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india