Best News Portal Development Company In India

जागतिक पातळीवर मानवतावादाचा विचार मजबूत करण्यासाठी बुद्ध विचारांच्या तत्त्वज्ञानाचीच गरज : ना. रामदासजी आठवले !

जगतिक पातळीवर मानवता वादाचा विचार मजबूत करण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विचारांचीचं गरज : नामदार रामदासजी आठवले
——————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
बुद्ध तत्त्वज्ञानाचा विचार हा मानवतावादी विचार असून जगामध्ये मानवतावाद मजबूत करण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाच्याचं विचारांची गरज आहे.म्हणूनचं आज जग म्हणत आहे आम्हाला “युद्ध नको बुद्ध हवा” तेंव्हा अमेरिकेसारख्या देशाने आम्हाला मानवतावाद शिकवू नये कारण अडीच हजार वर्षांपूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्ध यानी या भारत भूमीतून मानवतेचा समतेचा शांतीचा आणि अहिंसेचा विचार जगाला दिलेला आहे.आम्ही भारतीय हे मनवतावादीच आहोत असे प्रतिपादन देशाचे सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांनी किल्लारी तालुका औसा येथे आयोजित धम्म परिषदेत बोलताना केले.
. तक्षशीला बुद्ध विहार कमिटी किल्लारी व भंते धम्मसार थेरो यांच्या पुढाकारातून किल्लारी येथील तक्षशिला बुद्ध विहार व तथागत बुद्ध गार्डन किल्लारी या ठिकाणी विशाल पाचव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदन्त उपगुप्त महाथेरो हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नामदार रामदास आठवले व औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार हे होते.
या परिषदेसाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून पूज्य भन्ते संघ आलेले होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण व तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करून या धम्म परिषदेला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नामदार रामदासजी आठवले बोलत होते.पुढे बोलताना ते आपल्या नेहमीच्या चारोळीच्या शैलीमध्ये म्हणाले की ” मी तर उभा आहे गौतम बुद्धांच्या दारी।
इथे जमली आहे लातूर जिल्ह्यातील जनता सारी ।
मला इतिहास घडवायचा आहे नवा । कारण किल्लारी येथे दिसते आहे तथागतांची हवा ।
माझ्या पाठीशी आहे माझा लाडका भिवा ।
म्हणूनच मला अंधारा मध्ये दिसतो आहे परिवर्तनाचा दिवा।
अशा रितीने तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराने मला परिवर्तनाचा नवा इतिहास घडवायचा असून किल्लारी येथील ही धम्म परिषद म्हणजे समाज परिवर्तनाची एक नांदी आहे अशा आशयाची चारोळी त्यांनी या ठिकाणी करून उपस्थित सर्वाना बौद्ध धम्माच्या मार्गाने जाण्याचे आवहान केले तर किल्लारी येथील तक्षशिला बुद्ध विहार हे मानवतेचा विचार देणारे एक संस्कार केंद्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया त्यासाठी मला जेवढे शक्य आहे तेवढे सहकार्य मी करेन अशा पद्धतीचे आश्वासन या धम्म परिषेदचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.या परिषदेस लातूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित पूजनीय भिकू संघाची धम्मदेशना झाली या परिषदेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भंते धम्मसार थेरो व भत्ते सुमित नागसेने यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार परिषदेचे स्वागताध्यक्ष युवराज गायकवाड यानी मानले.
यावेळी रिपाइं (आठवले)पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,युवा आघाडीचे राज्य अध्यक्ष पप्पू कागदे सह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india