प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात उमरग्यात आमरण उपोषण; अखेर आमदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची सांगता….
तलमोड आनंद सुर्यवंशी.
पुनर्वसित गावांच्या कबाले (मालकी प्रमाणपत्र) वाटपाच्या मागणीसाठी प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर आमदार प्रवीण स्वामी यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या दि. ०१/०१/२०२६ च्या आदेशानुसार पुनर्वसन गावांचे कबाले वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून या आदेशाचे उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचे सांगत आंदोलकांनी १ एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी धाराशिव, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उमरगा यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून आंदोलकाने आमरण उपोषण सुरू केले होते.
अखेर आमदार प्रवीण स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाकडून या विषयावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. आमदारांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलकाने आपले उपोषण मागे घेतले आहे.







