Best News Portal Development Company In India

डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग ! अविनाश जोशी/करमाळा .

डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग
अविनाश जोशी/करमाळा
करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन येथे यशवंत अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी ‘भविष्यातील करिअरची यशस्वी पायाभरणी’ याविषयावर मार्गदर्शन करताना दिशा अकॅडमी, वाई चे संस्थापक डॉ. नितीन कदम सर यांनी करमाळकरांना सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग.
करमाळ्यात नव्याने सुरू होत असलेल्या यशवंत अकॅडमीचे उद्घाटन मा. श्री. विलासरावजी घुमरे सर, मा. डॉ. नितीन कदम सर, मा. श्री. मिलिंद फंड सर, मा. डॉ. गणेश करे पाटील सर, मा. श्री. संजय राजगुरु साहेब, मा. श्री. बाळकृष्ण लावंड सर, मा. श्री. बाळासाहेब नरारे सर, मा. श्री. कल्याणराव साळुंके सर आदी मान्यवारांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्द्घाटन प्रसंगी यशवंत अकॅडमीला शुभेच्छा देताना मा. श्री. विलासराव घुमरे सर यांनी करमाळ्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधत शैक्षणिक परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी यशवंत अकॅडमीला सर्वोतोपरी मदत करण्याची खात्री दिली.
डॉ. गणेश करे पाटील सरांनी करमाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि होणारा खर्च यातून मार्ग काढण्यासाठी यशवंत अकॅडमी सारख्या उत्तम शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गरज आणि उत्तम नियोजन व निकाल परंपरा असलेलल्या दिशा अकॅडमी सारख्या शैक्षणिक संकुलांची आवश्यकता आपल्या मनोगतातून अधोरेखित केली. त्याचबरोबर यशकल्याणी संस्थेकडून दोन्ही अकॅडमींना पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी यावर मत मांडताना डॉ. नितीन कदम सर यांनी सर्वसमावेशक मार्गदर्शन करून आजच्या विद्यार्थ्यांची करिअरची दिशा त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांवर न ठरवता त्यांच्या उपजत क्षमतेवर ठरवणे किती आवश्यक आहे सांगितले. तसे न केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनाची दशा झाल्याशिवाय राहणार नाही हेही नमूद केले. मुलांना भाषा, गणित, चित्रकला आणि मैदानी खेळ यांवर जोर देण्यास सांगितले. कौशल्ये आणि उपयोजन यांची पायाभरणी शालेय जीवनात होण्यासाठी आपण फाऊंडेशन कोर्सेसची सुरुवात त्यावर आधारित असणाऱ्या परीक्षांच्या तयारीतून करत आहोत. ज्ञानाचे उपयोजन आणि तेही अगदी जलद गतीने करता येणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी होय.
जर स्पर्धा परीक्षेची तयारी लवकर सुरू केली तर १२ वी नंतरचे डिप्रेशनही येणार नाही आणि अफाट खर्च होणारा गॅपही घ्यावा लागणार नाही.
पालक व शिक्षक वर्गाशी हितगूज करताना डॉ. नितीन कदम सर म्हणाले की भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांमध्ये आपले मूल टिकवायचे असेल तर त्याला त्याच्या नैसर्गिक उपजत क्षमतेवर त्याचे करिअर निवडू दया. तसे केल्यास कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते मूल डगमगणार नाही. करमाळ्यातील पालकांचा यशवंत अकॅडमीला चांगला आधार मिळेल कारण ही अकॅडमी अर्थिक फायद्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी काम करणार आहे.
या कार्यक्रमात सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. दत्तू इवरे सर यांनी आपले मनोगत मांडताना दोन्ही अकॅडमींच्या शैक्षणिक कार्यसंस्कृतीबद्दल गौरवोद्गार काढले. सिद्देश श्रीरामे (IIIT) व श्रेयस काटुळे (NIT) यांच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक पालक आपल्या पाल्यांसोबत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयेश पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे सर आणि प्रा. संदिप इवरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल श्रीरामे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. विनिता कांबळे मॅडम, सौ. माधुरी पवार मॅडम, सौ. सुवर्णा कांबळे मॅडम, श्रीमती अश्विनी पवार मॅडम, श्री. संतोष कांबळे सर, श्री. अतुल दाभाडे सर, श्री. संदिप पवार सर, श्री. कौस्तुभ सौंदाणे, इत्यादींचे सहकार्य लाभले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india