तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या तीन तेरा ; महाविकास आघाडीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन!
तुळजापूर प्रतिनिधी ; – श्रीक्षेत्र तुळजापूर येथील कायदा व सुव्येवस्था धाब्यावर बसून, खुन, चोऱ्या व रस्त्यावरील वाहने अडवून लूटमारीचे प्रकार वाढले असल्याने शहरवासिय ,भक्तांना कायदेशिर हक्काचे संरक्षण देण्याची मागणी महाविकास आघाडीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री क्षेत्र तुळजापूर येथे येणाऱ्या भक्तांची
वाहने रस्त्यात अडवून दिवसा व रात्री लुटमारीचे प्रकार वारंवार घडत आहेत.
त्याच बरोबर भर चौकात रहदारीच्या रस्त्यावर जिवंत मारणे आणि हात, पाय, मोडून
डोके फोडण्याचे प्रमाण हे फार वाढले आहे.
त्याच बरोबर नियम बाह्य ड्रग्स, दारु, गांजा, इत्यादी विक्री व व्यवसाधीनचे प्रकार. दिवसन- दिवस वाढत आहेत. तसेच अवैध हत्यारे, पिस्तुल इत्यादी वापर वाढला आहे.
महिला, लहान मुले आणि तरुण विद्यार्थिनी यांना आपल्या शहरात वावरणे कठीण झाले आहे. या गुन्हेगारीमुळे बाहेरुन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या मनात दहशत निर्माण झाली असून, शिक्षणास येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेनदिवस कमी होत आहे.
वरील सर्व बाबींकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस खाते व गुप्तचर यंत्रणा
दुलर्क्ष करित असलेले जाणवत असून यामुळे वाईट प्रवृत्तीच्या गुंडावर कायद्याचा वचक व भिंती
राहिलेली नसून, त्याच बरोबर मागील बऱ्याच वर्षांपासून चोऱ्या व इतर गुन्ह्यांचा तपास अद्याप
लागलेला जाणवत नाही.चा निवेदनाची दखल घेवूनशहरवासिय व भक्तांना कायदेशिर हक्काचे संरक्षण देण्याची मागणी महा विकासआघाडीचे नेते . एडवोकेट धीरज पाटील अमोल कुतवळ ऋषिकेश मगर रणजीत इंगळे आनंद जगताप सुधीर कदम नागनाथ भांजे उत्तम अमृतराव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी दिले. या निवेदनावर कोणती अंमलबजावणी होते ते पाहण्यात नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे.







