Best News Portal Development Company In India

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनाचे सोनं केलं आहे!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनाचे सोनं केलं आहे.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
आपले आचार विचार आणि उच्चार सुधारून चांगले जीवन जगण्याची शिकवण त्यानीं दिली.माणसाने पंचशीलाचें काटेकोर पालन केले की आपले आयुष्य सुखाचे होते. तथागताची शिकवण व डॉ बाबासाहेब आंबेडकराणी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्याचें सोने झाले असल्याचे प्रतिपादन त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित यांनी केले.
तालुक्यातील औराद येथिल बुद्धविहारात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्रावण गायकवाड, धम्मचारी प्रज्ञाजित, धम्ममित्र मारुती कांबळे, आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले की, येवला येथील परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची सिंहगर्जना केली पुढे २१ वर्षांनी त्यानीं आपल्याला बौद्ध धम्म दिला कारण या धम्माच्या वाटेवरून गेल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही अशी त्यांना खात्री होती.ज्यांनी ज्यांनी धम्माचे आचरण केले आहे त्यांचे जीवन सुखाचे झाले आहे.पंचशील परिपालनाच्या मार्गावर चालतांना आचरण करणाऱ्यांची प्रगतीच झाली आहे कोणाचीही अधोगती झाली नाही.तेंव्हा आपण ही धम्ममार्ग अनुसरून आपली प्रगती करावी, संसारात सुख आणावे, संसार सुखाचा होण्यासाठी धम्माचें आचरण महत्वाचे आहे.ज्यांच्या घरात पंचशीलाचें आचरण होत नाही त्यांची अधोगती होते.दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उधवस्त होत आहेत. सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी होत असून आपण सर्वांनी व्यसना पासून दूर राहावेअसे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात धम्मचारी प्रज्ञाजित यांनी त्रिरत्न वंदना घेतली. धम्ममित्र जी. एल. कांबळे यांनी धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india