Best News Portal Development Company In India

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींवर गुन्हा दाखल!

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात वाढत होताना दिसते आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शासन करून महिलांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात १५ वर्ष ९ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने गेल्या एक वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी तरुणासह त्याला मदत करणाऱ्या एका महिलेवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी (नाव, गाव गोपनीय) ही दि. २ जून २०२६ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावातच होती. यावेळी गावातीलच एका तरुणाने तिला फूस लावून आपल्या घरी नेले. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने गेल्या वर्षभरापासून या निष्पाप मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
​या संपूर्ण धक्कादायक प्रकारात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील ‘आरोपी क्रमांक २’ असलेल्या एका महिलेने त्या तरुणाला या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरत मदत केली. या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आपल्या मुलीसोबत घडलेला हा भयानक प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या आईने दि. ३ जून २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.
​तामलवाडी पोलिसांनी या प्रकरणी तात्परता दाखवत दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१), ३(५) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
​या घटनेचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत असून, आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. काल परवाच नळदुर्ग मध्ये ही अशीच घटना घडली होती . अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेत जिल्हाभरामध्ये वाढ होत असून अशा नराधमांना पोलिसांची भीतीच उरलेले नाही असे वाटते आहे. अशी दबक्या आवाजात नागरिकांतून चर्चा होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india