Best News Portal Development Company In India

लातूर-बीड-धाराशिव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ लोकप्रतिनिधींची भव्य संवाद बैठक उत्साहात संपन्न!

लातूर-बीड-धाराशिव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ लोकप्रतिनिधींची भव्य संवाद बैठक उत्साहात संपन्न

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उस्मानाबाद-बीड-लातूर (लातूर–बीड–धाराशिव) स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ लातूर येथे मतदार आणि कार्यकर्त्यांची भव्य संवाद बैठक नुकतीच प्रचंड उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या महत्त्वपूर्ण निवडणूक दौऱ्याची सुरुवात अत्यंत मांगल्यमय वातावरणात सकाळी ९:०० वाजता लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर मंदिरात दर्शनाने आणि विशेष रुद्राभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता स्थानिक ‘हॉटेल ग्रँड सरोवर’ येथे तिन्ही जिल्ह्यांतील मतदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित मतदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, बसवराज पाटील यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने मेहनत करावी, असे आवाहन करत मतदान केंद्रावर मतदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.
या मेळाव्यात मतदारांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी, पक्षाने माझ्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन मला ही उमेदवारी दिली आहे, या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवून आगामी काळात अत्यंत लोकाभिमुख आणि समाजाभीमुख स्थानिक स्वराज्य संस्था घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली आणि मतदारांना आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात अत्यंत ठाम निर्धार व्यक्त करत, बसवराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणून जिल्ह्यात महायुतीचा ६ वा आमदार विजयी करण्याचा संकल्प जाहीर केला; तसेच हा निर्धार पूर्ण करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील सर्व कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या भव्य बैठकीला महायुतीच्या अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, निवडणूक निरीक्षक सुनील राणे, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री व आमदार राणाजगजितसिंग पाटील, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चना पाटील,लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उषा पाटील तळेगावकर, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार सुधाकर शृंगारे, शिरूर कासार नगरपरिषद अध्यक्षा सौ. प्रतिभाताई गाडेकर,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार दिनकरराव माने, माजी आमदार बदामराव पंडित, माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, माजी आमदार गोविंदआण्णा केंद्रे, प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सौ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, योगेश क्षीरसागर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, बीडचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, अक्षय मुंदडा, मुरूमचे नगराध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा बँक चेअरमन बापूराव पाटील, उमरगा जनता बँक चेअरमन शरण पाटील, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांचा समावेश होता. याशिवाय धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अस्मिताताई कांबळे, लातूरचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख आणि धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. नितीन काळे, प्रदेश प्रवक्ते प्रेरणाताई होनराव यांच्यासह उस्मानाबाद, बीड आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यातील भाजपाचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण बैठकीचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन जिल्हा परिषद गटनेते रामचंद्र तिरुके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अजित पाटील कव्हेकर यांनी मानले. महायुतीच्या या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे निवडणूक क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india