Best News Portal Development Company In India

उमरगा शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काँग्रेसचे महावितरणला निवेदन!

उमरगा शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काँग्रेसचे महावितरणला निवेदन
———
उमरगा प्रतिनिधी : उमरगा शहरातील विविध भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन रेकूलवाड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये कोणतेही ठोस कारण नसताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच वीज गेल्यानंतर अनेक तास ती पूर्ववत होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. विशेषतः शहरातील सामान्य नागरिक, शासकीय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालय, बँका तसेच इतर शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही वीज खंडित झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु आहे त्यावर हि परिणाम होत आहे . त्यामुळे महावितरणने तातडीने उपाययोजना करून शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष विजय वाघमारे , नगरसेवक विजय दळगडे , संजय जाधव , ख्वाजा मुजावर , अभिषेक औरादे, सोशल मिडिया प्रमुख अमित रेड्डी , मागासवर्गीय सेलचे प्रफुल गायकवाड , अनिल चव्हाण , गोविंद राठोड , रामचंद्र जाधव व कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india