Best News Portal Development Company In India

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत वागदरी येथे आरोग्य तपासणी संपन्न!

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत वागदरी येथे आरोग्य तपासणी संपन्न !
———————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
मुख्यमंत्री आरोग्य ग्रामसमृद्धी अभियाना अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले असून या शिबिरात उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
राष्ट्राच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये शिक्षण,आरोग्य, आणि रोजगार हा महत्त्वाचा भाग असून या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या असून शिक्षण रोजगार आणि आरोग्य यावर भर देऊन महाराष्ट्र शासन सध्या राज्यभर विविध योजना व अभियान राबविधाना दिसत आहे.त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री आरोग्य ग्राम समृद्धी अभियान सुरू केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वागदरी तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेतलेला ‘ आहे. त्या अनुषंगाने वेळोवेळी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर घेतले जात आहे.
दि.११ जुलै २o२६ रोजी आरोग्य समुदाय अधिकारी डॉ.यशवंत नरवडे खुदावाडी/नळदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आरोग्य ग्राम समृद्धी अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर यशवंत नरवडे म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती असून वाढत्या वयाबरोबर गावातील ३० वर्षांपुढील स्त्री पुरुष यांनी आरोग्य तपासणी करून योग्य तो प्रथमोपचार व आरोग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थ रुग्णांची रक्तदाब मधुमेह व अन्य आजाराबाबत तपासणी करून त्यांना प्रथम उपचार म्हणून औषय गोळ्या व आरोग्य सल्ला देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून केले जात असून या शिबिरातून एखादा गंभीर आजारी रुग्ण निदर्शनास आल्यास त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मोफत आरोग्य सल्ला देण्यात येतो. तेव्हा वेळोवेळी ज्या ज्या वेळेस .या अभियाना अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येईल त्या त्या वेळेस ग्रामस्थानी आपली आरोग्य तपासणी करून वेळीच प्रथम उपचार व आरोग्य सल्ला घेणे ही काळाची गरज आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरास येथील ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेक स्त्री-पुरुषांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळीआरोग्य तपासणीचे काम डॉ.यशवंत नरवडे,आरोग्य सेवक आर.बी. हवालदार अशा कार्यकर्ते पार्वती बिराजदार यांनी काम पाहिले.
या अभियानाबाबत येथील ग्रामस्थानी व रुग्णनी समाधान व्यक्त केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india