Best News Portal Development Company In India

तुळजापुरात धाडसी घरफोडी! बंद घर फोडून २ लाखांच्या रोखडीसह ४ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास!

तुळजापुरात धाडसी घरफोडी! बंद घर फोडून २ लाखांच्या रोखडीसह ४ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास!
​तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर शहर तालुक्यासह आसपासच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तुळजापूर शहरातील पांडुरंग नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५० ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय सुरेश राक्षे (वय ३० वर्षे, रा. पांडुरंग नगर, तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे राहते घर दि. १२ जुलै २०२६ रोजी रात्री २१:०० वाजल्यापासून ते दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजण्याच्या दरम्यान बंद होते. या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
​चोरीला गेलेला मुद्देमाल-
​रोख रक्कम: ₹ २,००,००० (दोन लाख रुपये)
​सोन्याचे दागिन- ५० ग्रॅम वजनाचे दागिने
​एकूण किंमत- ₹ ४,४०,००० (चार लाख चाळीस हजार रुपये)
​या धाडसी चोरीनंतर फिर्यादी अक्षय राक्षे यांनी दि. १३.०७.२२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात प्रथम खबर (FIR) दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी घराबाहेर जाताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक आणि सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india