Best News Portal Development Company In India

तुळजापुरात ‘निराधार’ योजनेतील बंद अनुदान सुरू करण्यासाठी ३० जुलैला धडक महामोर्चा!

तुळजापुरात ‘निराधार’ योजनेतील बंद अनुदान सुरू करण्यासाठी ३० जुलैला धडक महामोर्चा!
तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) एल्गार; काटी येथील आंदोलनाला पाठिंबा.
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना इत्यादी विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांचे गेल्या १ वर्षापासून आणि काहींचे ५ ते ६ महिन्यांपासून बंद पडलेले थकीत अनुदान त्वरित मिळावे, या मागणीसाठी गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी तुळजापूर तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा उपअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जिल्हा धाराशिव यांच्या वतीने माजी उपसभापती अशोक आगतराव जाधव यांनी तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून काटी येथे सुरु असलेल्या श्री काणोबाबा आंदोलनाच्या संदर्भाला जोडून हा महामोर्चा आयोजित करण्यात येत आहे.
काटी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री अशोक अमृतराव जाधव यांच्या पुढाकाराने वाढदिवसाच्या आयोजन करण्यात आले. वृद्ध आणि निराधारांची उपासमार; शासनाची वेबसाईट बंद असल्याचा फटका!
शासनाच्या या सामाजिक साहाय्य योजनांमध्ये कमालीची अनियमितता दिसून येत आहे. अनेक लाभार्थ्यांनी आवश्यक ती सर्व ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे चालू झालेले अनुदान पुन्हा अचानक बंद झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शासनाची संबंधित वेबसाईट (Portal) बंद असल्याने नवीन नोंदी व अनुदान वितरणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, तालुक्यातील हजारो वृद्ध, अपंग व निराधारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदारांकडे करण्यात आलेल्या मुख्य मागण्या:
शासनाने त्वरित संबंधित वेबसाईट/पोर्टल सुरळीत व सुरू करावे.
प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान निराधारांचे अनुदान थेट खात्यात जमा करावे.
यापूर्वी बंद पडलेले व नव्याने सुरू करण्यात आलेल्या अनुदानाचा थकीत हप्ता (फरक) त्वरित देण्यात यावा.
राष्ट्रीय कुटुंब आर्थिक साहाय्य योजनेचे अनुदान तत्काळ वितरित करावे.
योजनेतील लाभार्थ्यांसाठी ‘CKYC’ आणि आधार सीडिंग (Aadhar Seeding) ची अट शिथिल करण्यात यावी.
नवीन प्रस्तावांसाठी असलेली रु. २१,०००/- ची जाचक उत्पन्न अट शिथिल करावी.
प्रतिक्रिया: > “शासकीय तांत्रिक त्रुटी आणि निष्काळजीपणामुळे आज तालुक्यातील निराधार व वृद्ध बांधव हवालदिल झाले आहेत. त्यांना हक्काचे मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे. या सर्व मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.” > — अशोक आगतराव जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – धाराशिव)
नायब तहसीलदारांच्या हस्ते निवेदन स्वीकारून
आंदोलनाची समाप्ती करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india