Best News Portal Development Company In India

तुळजाभवानी चरणी वरुणराजाला साकडे; पावसासाठी शेकडो महिलांचा नामजप!

तुळजाभवानी चरणी वरुणराजाला साकडे; पावसासाठी शेकडो महिलांचा नामजप!

​तुळजापूर: महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, पशुपक्षी, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि दमदार पावसासाठी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घालण्यात आले. शहरातील तब्बल २०० हून अधिक महिलांनी एकत्र येत देवीचा नामजप करत पावसासाठी प्रार्थना केली.

​तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद ‘पिट्टू भैय्या’ गंगणे यांच्या संकल्पनेतून या नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर दादा गंगणे, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, बाळासाहेब भोसले, महावीर कासार, सर्वोत्तम जेवळीकर, अमित कदम, संतोष इंगळे, शंतनू गंगणे, धैर्यशील दरेकर, सचिन टोले, विश्वास मोटे, बापू भोसले, विनोद कदम, धनंजय पाठक, हरिदास वट्टे, विक्रम मोठे, प्रथमेश गारडे आदींच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

​नामजप पूर्ण झाल्यानंतर उपस्थित महिलांना शिवांकुर (शिवाजी बोधले) यांच्या वतीने पाणी आणि दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सर्व महिलांना देवीचे दर्शन घडवून आणत त्यांची नारळाने ओटी भरली.

यावेळी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरुणराजाने लवकर हजेरी लावून राज्यातील दुष्काळाचे संकट दूर करावे आणि पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी प्रार्थना सर्वांनी आई तुळजाभवानी चरणी केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india