Best News Portal Development Company In India

हिंदी भाषा ज्ञानपरंपरेशी जोडणारी आणि रोजगाराच्या नव्या संधी देणारी भाषा — डॉ. विनोदकुमार वायचळ

हिंदी भाषा ज्ञानपरंपरेशी जोडणारी आणि रोजगाराच्या नव्या संधी देणारी भाषा — डॉ. विनोदकुमार वायचळ!

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
हिंदी दिवस पखवाड्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. विनोदकुमार वायचळ यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते.

पुढे बोलताना डॉ. वायचळ म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये विविध विषयांचे समृद्ध ज्ञान सामावलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव शिक्षण, संशोधन, उद्योग आणि रोजगाराच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांनी AI तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून आपल्या ज्ञान व कौशल्यांमध्ये भर घातली पाहिजे. बदलत्या काळानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांसमोर रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. संजय अस्वले म्हणाले की हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून ती भारतीय ज्ञान, संस्कृती आणि विचारपरंपरेशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. आजच्या AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी भाषिक ज्ञानासोबत तंत्रज्ञान व रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना बदलत्या जगातील नव्या संधींची जाणीव होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. पी. इंगळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले व डॉ. डी. बी. ढोबळे, डॉ. सन्मुख मुच्छटे , डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, प्रा. प्रशांत साळुंके, प्रा. जी. के. पाटील, प्रा. बीना लोकरे, प्रा. गोविंद नागदे प्रा. संदीप गुरव, प्रा. अनिल चव्हान, प्रा दयानन्द जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा शिंदे हिने केले तर पूजा हांडे यांनी आभार मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india