Best News Portal Development Company In India

तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९८ हजारांच्या बेकायदेशीर दारूसह दुचाकी जप्त, दोघांवर गुन्हा दाखल!

तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९८ हजारांच्या बेकायदेशीर दारूसह दुचाकी जप्त, दोघांवर गुन्हा दाखल!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर ते नळदुर्ग रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात तुळजापूर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९८ हजार ८० रुपये किमतीच्या ९६ सीलबंद देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक मोटारसायकल जप्त केली असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:०० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर ते नळदुर्ग जाणारे रोडवरील एच. पी. पेट्रोल पंपासमोर दोघे जण बेकायदेशीर दारू विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली.

​ताब्यात घेतलेले आरोपी-
१. आनंद सुनिल पवार (वय ३२ वर्ष, रा. इंदिरा नगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
२. सुरेश सोपान सुर्यवंशी (वय ५० वर्ष, रा. औराद, ता. उमरगा, ह.मु. हॉटेल महाराज, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
​
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारूच्या एकूण ९६ सीलबंद बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा मिळून ९८,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र मद्य मनाई कायदा’ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india