राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते : प्राचार्य डॉ.सुभाष राठोड
————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव,शिस्त, नेतृत्व गुण आणि सेवाभाव विकसित होतो तेंव्हा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांनी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे बोलताना केले.
बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता.तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवेचे मूल्य आणि व्यसनमुक्तीचा संदेश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ.सुभाष राठोड बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाज हिताच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.
. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बृहस्पती वाघमारे यांनी केले.यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची आणि सामाजिक कार्यातील योगदानाची माहिती दिली.
.
या प्रसंगी प्रा. डॉ. हाशमबेग मिर्झा, प्रा. डॉ. तुळशीराम दबडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिटे (NSS कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. निलेश शेरे, प्रा. बाबासाहेब सावते (NSS कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. अतिश तिडके, प्रा. अकबर सय्यद आणि प्रा.संग्राम जाधव सह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
या वेळी प्रा.बाबासाहेब सावते यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि जबाबदार जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शेवटी प्रा.डॉ. बृहस्पती वाघमारे यांच्या अभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







