वागदरी येथे भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप
—————————————————–
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे विघ्नहर्ता गणरायाला भक्तिमय वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात, भजनी मंडळाच्या तालात तर लेझीम संघाच्या जोशात गणरायाला निरोप देण्यात आला.
येथील शिव गणेश तरुण मंडळाच्या वतीने वागदरी येथे गणेश मंडळाने गणरायाच्या आगमना प्रित्यार्थ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. गणेश मूर्ती स्थापनेपासून ते गणेश विसर्जन कालावधी पर्यंत शिव गणेश तरुण मंडळाच्या वतीने दररोज नित्य नियमाने गणेश आरती सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेवटी दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्कश्य डॉल्बीला फाटा देत गणेश मंडळाने पारंपारिक वाद्य श्री संत भगवान सिंग महाराज भजनी मंडळाच्या दिंडीच्या तालात, गावातील चिमुकल्यांचा लेझीम संघाच्या जोषात अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
वागदरी हे गाव श्री संत भगवानसिंग महाराज देवस्थानामुळे वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेले गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे.शासनाने निर्देश केल्याप्रमाणे डॉल्बी विरहित गणेश मिरवणूक या संकल्पनेची प्रत्यक्षात आमलं बजावणी करत येथील शिव गणेश तरुण मंडळाने डॉल्बी शिवाय पारंपारिक वाद्य भजनी मंडळाच्या तालात व लेझीम संघाच्या जोशात अत्यंत मनोभावे भक्तिमय वातावरणात गावातून गणरायाची भव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया..ss पुढच्या वर्षी लवकर या..ss अशा जयघोष करत गणरायाला निरोप देण्यात आला.
या मिरवणुकीमध्ये शिव गणेश तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गावातील सर्व ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







