रिपाइं (आठवले) पक्षाच्या वर्धापण दिनास धाराशिव जिल्ह्यातील कार्यकार्यानी व आंबेडकर आनुयायानी मोठ्या संख्येने सभाग नोंदवावा : राजा भाऊ ओव्हाळ
———————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय व अधिकारता केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि.३ ऑक्टोबर २o२६ रोजी नवी मुंबई वाशी येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या ६९ व्या वर्धापन दिनास धाराशिव जिल्ह्यातील तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी व आंबेडकर अनुयायानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजा भाऊ ओव्हाळ यांनी तुळजापूर येथे बोलताना केले.
दि.२५ सप्टेंबर २o२६ रोजी तुळजापूर येथील आनंद बुद्ध विहार सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची तुळजापूर शहर व तालुका बैठकीचे आयोजन रिपाइं (आठवले) चे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या प्रसंगी राजा भाऊ ओव्हाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरातील बहूजनांच्या न्याय हक्कासाठी नामदार रामदास आठवले हे संघर्ष करीत आहेत.दर वर्षी त्यांच्या मार्गदर्शना खाली पक्षाचा राज्यव्यापी वर्धापनदिन साजरा केला जातो.या वर्षी हा वर्धापण दिन नवी मुंबई वाशी येथे दि.३ ऑक्टोबर २.o२६ रोजी साजरा केला जाणार आहे तरी रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.या वेळी रिपाइं (आठवले ) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब.आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पूजन करून आभिवादन करण्यात आले.या बैठकीत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीचे प्रास्ताविक रिपाइं (आठवले) चे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यानी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस. के. गायकवाड यानी केले.
या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ उर्फ मुन्ना ओव्हाळ,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, प्रताम कदम, युवा जिल्हा अध्यक्ष रणजीत बनसोडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लष्करे,युवा नेते आश्रुबा शितोळे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशील कदम तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, तालुका सचिन सुरेंद्र सुरवसे,तालुका संघटक सुरेश लोंढे, नगर सेवक मारुती खारवे,रिपाइं चे तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे,लहु घोडके,प्रदिप सिटसट, रामचंद्र लोंढे, अरविंद लोखंडे महादेव जेटीथोर,मारुती जेटीथोर,सिद्धेश्वर थोरात रतन हावळे,वैभव जानराव सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






