Best News Portal Development Company In India

तुरोरी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात गणरायाचे विसर्जन.

तुरोरी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात गणरायाचे विसर्जन.

तुरोरी प्रतिनिधी दययंती भालेराव.

(दि.२५)तालुक्यातील तुरोरी येथे हणुमान चौकातील गणरायाला अभिषेक, नैवेद्य, महानैवेद्य, प्रसादासह विधिवत सन्मानाने भाविकभक्ताच्या वतिने मनोभावे भक्ती भावाने वंदन करण्यात आले.

गावातील प्रमुख मार्गावरुन टाळ पखवाजाच्या हरीनामाच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या , गणपती चालले गावाला चैन पडेना जिवाला,, जयजयकार करत पखवाजाच्या,विणा, टाळाच्या तालावर नवतरुण युवक, महिला,पुरुषांनी ठेका धरून फुगडी धरुन गणरायाला निरोप देण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती युवराज जाधव, गणेश मंडळाने अध्यक्ष बालाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सौदागर सुर्यवंशी, भिमराव सुर्यवंशी, तसेच माजी उपसरपंच पंडीत शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य मारुती थोरे ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार शिंदे , नागाय्या स्वामी, विश्वनाथ माने,जनार्दन भोसले,आशोक बिराजदार, शिवशंकर जाधव,ज्ञानेश्वर पाटिल,लक्ष्मण कुभार, कमलाकर शिंदे,की सन कलमले कमलाकर जाधव,सतिश सोमवंशी, आदिसह भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदा आणी सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरगा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार अनिरुद्ध कावळे यांनी गणपती विसर्जनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india