*पारंपारिक खेळाच्या सादरीकरणाने उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल कडून गणरायाला निरोप*
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२५)उमरगा वासियाकडून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा पासून संपूर्ण उमरगा शहरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये लाठीकाठी चक्र तलवारबाजी लेझीम व झांज पथका चे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्याकडून करण्यात आले मिरवणुकीमध्ये पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते .
मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या कल्पनेतून प्रथमच जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली व गेली बारा दिवस अतिशय आनंदाने सर्व विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाले या मिरवणुकीमध्ये प्रशालेतील धनराज तेलंग विद्यानंद सुत्रावे बशीर शेख सदानंद कुंभार नागेश स्वामी प्रवीण शिंदे राजू सरपे धनराज गाडेकर इगवे सर आणि वर्षाराणी पाटील सोनाली मुसळे भाग्यश्री पंडित पुजा गुंडीले व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
लेझीम व झांज पथकाची तयारी करून घेण्यासाठी क्रीडा शिक्षक महंमद रफी शेख सरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.







