Best News Portal Development Company In India

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला दिलासा : खानापूर व नळदुर्ग येथे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद!

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला दिलासा : खानापूर व नळदुर्ग येथे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
———————————————————

नळदुर्ग (एस.के. गायकवाड):

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे आमदार तथा माजी मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खानापूर व नळदुर्ग ता. तुळजापूर आणि परिसरातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसी संवाद साधुन शिवसेना आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून आपल्या व्यथा आणि वेदना शासन दरबारीं मांडून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयन्त करणार असे सांगून कोणी ही अत्महत्या करू नका निराश होऊ नका शिवसेना (उबाठा) आपल्या पाठीशी आहे. अशा प्रकारे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

दि.२६ सप्टेंबर २o२६ रोजी शिव सेना (उबाठा ) चे आमदार तथा माजी मंत्री यूवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यातील दुकाळ ग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले असता तुळजापूर तालूक्यातील खानापूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पीकांच्या नुकसानीची पहाणी करून खानापूर व परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून वरिल प्रमाणे दिलासा दिला.
या वेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे,शिवसेना प्रवक्ते अतुल भोवर,शिवसेना आमदार प्रवीण स्वामी,शिव सेना (उबाठा) जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील, ग्रामीण जिल्हा प्रमुख रणजीत पाटील,जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे जि.प. सदस्य डॉ.जितेंद्र कानडे, तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी,सह दुष्काळग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर नळदुर्ग येथेही खंडोबा मंदिरा जवळ राष्ट्रीय महामार्ग ६५ वर शिव सेना कार्यकर्ते व दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याना आमदार आदित्य ठाकरे यांनी धावती भेट दिली. या वेळी दुष्काळ ग्रस्त शेतकन्ऱ्याना शासनाने सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणी सह विविध मागण्याचे निवेदन शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने अदित्य ठाकरे याना देण्यात आले.यावेळी शिव सेना (उबाठा) चे जिल्हा नेते कमलाकर काका चव्हाण, तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर,शहराध्यक्ष संतोष पुदाले,शाम कणकधर, दत्तात्रय वाघमारे सर,शेतकरी संघर्ष समिती चे दिलीप जोशी पंडित पाटील महेश घोडके अजमुद्दीन शेख रहमान शेख बालाजी ठाकूर काशिनाथ काळे बंडू मोरे श्रीकांत पोतदार,सोमनाथ म्हेत्रे,प्रसाद भोसले सह दुष्काळग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india