Best News Portal Development Company In India

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.२९ आणि ३० सप्टेंबर रोजी* *श्रीधररावजी मोरे व्याख्यानमालेचे आयोजन*

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.२९ आणि ३० सप्टेंबर रोजी*
*श्रीधररावजी मोरे व्याख्यानमालेचे आयोजन*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळखंडात स्थापना झालेल्या भारत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी श्रीधररावजी मोरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.२९ आणि ३० सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. विविध सामाजिक विषयांच्या संदर्भात नवयुवकांमध्ये जाणिवा आणि जागृती घडविण्यासाठी विचारमंथन घडवून आणणे हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे.

निजाम राजवटीत १९४१ साली भारत शिक्षण संस्थेची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी उदात हेतूने केली होती. शिक्षण हीच प्रगतीची पहिली पायरी ओळखून भारत शिक्षण संस्थेने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून या भागात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या विकासात कर्मयोगी श्रीधरराव मोरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

त्यामुुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २९ आणि ३० सप्टेंबर रोजी दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ सप्टेंबर रोजी सांगली येथील प्रसिद्ध कवी मा. नितीन चंदनशिवे यांचे ‘ माझं जगणं, माझी कविता’ या विषयावर पहिले व्याख्यान पुष्प आयोजित केले आहे.

३० सप्टेंबर रोजी जळगाव येथील सुप्रसिद्ध कवयित्री माननीय गुंजन पाटील यांचे ‘मूल्ये संस्कार जपूया, माणूस घडवूया’ या विषयावर दुसरे व्याख्यान आयोजित केले आहे.

या दोन दिवसीय व्याख्यानमालेस शिक्षणप्रेमी बांधव, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय अस्वले आणि संयोजन समितीने केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india