Best News Portal Development Company In India

वाशी पोलिसांची मोठी कारवाई! घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी उधळली; फॉर्च्युनरला धडक देत पळणाऱ्यांवर गुन्हा दाखल!

वाशी पोलिसांची मोठी कारवाई! घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी उधळली; फॉर्च्युनरला धडक देत पळणाऱ्यांवर गुन्हा दाखल!

तुळजापूर प्रतिनिधी:-
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रास्त्रांसह दरोड्याची पूर्वतयारी करणाऱ्या एका टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपींनी समोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीला धडक दिली. या कारवाईत पोलिसांनी दरोड्याचे साहित्य व वाहनासह तब्बल ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील पारा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात एक स्कार्पिओ गाडी (क्र. MH 02 CV 5858) संशयास्पदरित्या थांबली होती. गाडीतील इसम संगणमत करून दरोड्याची पूर्वतयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाशी पोलिसांच्या पथकाने सदर वाहनास थांबवून तपासणी सुरू केली. पोलीस कर्मचारी गाडीच्या मागच्या बाजूने चेकिंगसाठी जात असतानाच, आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी अतिवेगाने गाडी चालवून सारोळा मांडवाच्या दिशेने पळ काढला. पळून जात असताना आरोपींच्या भरधाव स्कार्पिओने समोर उभी असलेली फॉर्च्युनर गाडी (क्र. MH 44 AE 4545) हिला जोरदार धडक दिली.

घातक हत्यारे अन् ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गाडीत अनेक घातक वस्तू व हत्यारे आणली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून दरोड्यासाठी लागणारी तलवार, लोखंडी हातोडा, डोळ्यात टाकण्यासाठी लाल तिखटाची पुडी, दोरी, प्लास्टिकचा पाईप आणि प्लास्टिक कॅड असा एकूण ५,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल झालेले आरोपी-
१. शाम राजेंद्र काळे (रा. ब्रह्माचीवाडी, ता. कळंब)
२. मुरली देविदास शिंदे (रा. पारा, ता. वाशी)
३. आकाश उर्फ गमड्या देविदास शिंदे (रा. पारा, ता. वाशी)
४. रामेश्वर सुरेश काळे (रा. पारा, ता. वाशी)
५. अर्जुन दत्ता शिंदे (रा. पारा, ता. वाशी)
सदर आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४), ३१०(५), २८१ सह शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस

या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत. सदरील कारवाईने त्या चोरांचे धाबे दणाणले आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india