Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्हा पोलिसांचे नागरिकांना आवाहन: ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती मास’; ऑनलाईन ठगांपासून सावध राहा!

धाराशिव जिल्हा पोलिसांचे नागरिकांना आवाहन: ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती मास’; ऑनलाईन ठगांपासून सावध राहा!

तुळजापूर प्रतिनिधी:-
जिल्ह्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोबर २०२६ हा महिना ‘सायबर जनजागृती मास’ म्हणून साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी धाराशिव पोलिसांकडून विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​
‘या’ आमिषांना आणि प्रकारांना बळी पडू नका-
​बँक तपशील शेअर करू नका: बँक अधिकारी असल्याचे भासवून कुणीही फोन केल्यास स्वतःचा OTP, UPI PIN, ATM PIN, CVV किंवा पासवर्ड कोणत्याही परिस्थितीत देऊ नका.
​’डिजिटल अरेस्ट’ आणि खोटे अधिकारी: पोलीस, CBI, RBI किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे कायद्याची भीती दाखवत पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.
​बोगस नोकरी व ट्रेडिंग सायबर फ्रॉड: ‘घरबसल्या नोकरी’, ‘कमी वेळेत दुप्पट नफा’ किंवा ‘ऑनलाईन ट्रेडिंग’च्या नावाखाली होणाऱ्या गुंतवणुकीपूर्वी संबंधित संस्था अधिकृत आहे का, याची शहानिशा करा.

​संशयित ॲप्स व लिंक्स: अनोळखी लिंक्स, APK फाइल्स डाऊनलोड करू नका. मोबाईलचा रिमोट ॲक्सेस देणारे ॲप्स इन्स्टॉल करू नका.
​सोशल मीडिया सुरक्षा: अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. सायबर स्टॉकिंग, फेक प्रोफाइल, अश्लील मेसेज, ब्लॅकमेलिंग किंवा सेक्सटॉर्शनचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

​फसवणूक झाल्यास काय करावे?
​१. तत्काळ मदत (१९३०): ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास कोणताही विलंब न करता १९३० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा.
२. सायबर पोर्टल: अधिकृत सायबर क्राईम पोर्टल https://cyberpolice.nic.in/ वर तक्रार नोंदवावी.
३. संशयित आंतरराष्ट्रीय कॉल: संशयास्पद आंतरराष्ट्रीय कॉल किंवा मेसेज आल्यास https://sancharsaathi.gov.in/ या संकेतस्थळावर तक्रार करा.
​टीप: तक्रार नोंदवताना मोबाईल क्रमांक, बँक खाते विवरण, Transaction ID / UTR, रक्कम, वेळ आणि स्क्रीनशॉट ही माहिती अचूक द्यावी व मिळालेला Reference/Complaint Number सुरक्षित ठेवावा.

​”सतर्कता हीच सुरक्षितता! सायबर फसवणूक टाळा आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करा.” — धाराशिव जिल्हा पोलीस दल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india